Home /News /videsh /

पुरुष की महिला कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला? संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

पुरुष की महिला कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला? संशोधनात समोर आली धक्कादायक बाब

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाव्हायरस (Coronavirus) चं प्रमाण जास्त असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे.

    वुहान, 13 फेब्रुवारी : कोरोनाव्हायरस (Coronavirus) काय आहे?, त्याची लक्षणं (Coronavirus symptoms) काय आहेत? आणि त्यावर उपचार (Coronavirus treatment) काय आहेत? अशा अनेक प्रश्नांपैकी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका (Coronavirus risk) कुणाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आता संशोधकांनी शोधलं आहे. कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका आहे तो पुरुषांना. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाव्हायरसचं प्रमाण जास्त असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे. चीनच्या (China) वुहानमध्ये (Wuhan) कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला असू शकतो, हा अभ्यास संशोधकांनी याचठिकाणी केला. नुकत्याच झालेल्या 2 संशोधनातून दिसून आलं आहे की कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोक पुरुषांना आहे. हेदेखील वाचा - चीनहून आलेलं पार्सल घेताना सावधान ! पार्सलमध्ये ‘कोरोना’ तर नाही ना? चीनच्या वुहान विद्यापीठाच्या रुग्णालयात कोरोनाव्हायरसच्या संक्रमित रुग्णांचं परीक्षण केलं. या अभ्यासात 52 टक्के पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं. कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा तपासण्यात आला त्यावेळी एकूण रुग्णांपैकी 68 टक्के पुरुष रुग्ण होते. महिलांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त तज्ज्ञांच्या मते, महिलांची रोगप्रतिकारकशक्ती पुरुषांच्या तुलनेत जास्त असते. याआधीदेखील चीनमध्ये सार्स (SARS) व्हायरसने हाहाकार माजवला तेव्हा 20 ते 54 वयोगटातील महिलांना सार्सची लागण झाली होती. मात्र पुरुषांचा विचार केल्यास 55  वयापर्यंतच्या सर्व पुरुषांमध्ये सार्सची लक्षणं सर्वाधिक दिसून आली. हेदेखील वाचा - तुम्हीही असू शकता 'कोरोना'चे Super spreader! विषाणू वेगाने पसरायचं भयंकर कारण तुम्हाला कोरोनाव्हायरस झाला की नाही हे कसं समजलेल? कोरोनाची लक्षणं ही सर्वसामान्य लक्षणांसारखीच आहेत. सुरुवातीला डोकेदुखी, नाक वाहणं, खोकला, घसा खवखवणे, ताप, शरीरात थकवा, शिंका येणे अशी लक्षणं दिसून येतात आणि हळूहळू रुग्णांना न्युमोनिया असल्यासारखं वाटतं. कोरोनाव्हायरस फुफ्फुसावर हल्ला करतो आणि त्यामुळे कमजोरी येते. शरीर इतकं कमजोर होतं, की कोरोनापासून वाचणं अशक्य होतं. सुरुवातीला कोरोनाव्हायरस संसर्गजन्य आजार नाही असं वाटलं होतं, मात्र खरं तर हा व्हायरल 1.4 ते 2.5 लोकांना संक्रमित करू शकतो असं दिसून आलं. चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 1,113 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी 2,015 नवीन प्रकरणं समोर आलीत. यासह जपानी क्रुझवर 138 भारतीय अडकले, त्यापैकी दोघांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. फक्त चीनच नाही तर संपूर्ण देशाने कोरोनाव्हायरसचा धसका घेतला आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरसबाबत जगभर विविध संशोधन सुरू आहे. हेदेखील वाचा - PM मोदींना मदतीसाठी आर्त हाक घालणाऱ्या त्या जपानी क्रुझवरील भारतीयांना 'कोरोना'
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या