Home /News /videsh /

आई पुन्हा परतलीच नाही, अमेरिकन रुग्णांवर उपचार करताना भारतीय महिलेनं घेतला शेवटचा श्वास

आई पुन्हा परतलीच नाही, अमेरिकन रुग्णांवर उपचार करताना भारतीय महिलेनं घेतला शेवटचा श्वास

गेल्या 12 वर्षांपासून ज्या रुग्णालयात रुग्णांची सेवा केली तिथंच अखेरचा श्वास भारतीय महिलेनं घेतला. तिने मुलीला केलेला शेवटचा मेसेज डोळ्यात पाणी आणणारा आहे.

    न्यूयॉर्क, 17 एप्रिल :  एका नर्सला गेल्या 12 वर्षांपासून  ज्या रुग्णालयात काम करत होती तिथंच मृत्यू आला. 1994 ला अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या माधवी अया यांना कोरोनाची लागण झाली होती. 2008 पासून त्या ब्रुकलिनमध्ये सरकारी रुग्णालयात काम करत होत्या.  फिजिशियन सहाय्यक असलेल्या माधवी अया या रुग्णालयात एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडत होत्या. रुग्णाची आधीच्या आजारांची माहिती, त्याची लक्षणे याबाबत सर्व गोष्टींची तपासणी करत असतानाच त्यांनाही कोरोनाने गाठलं. रुग्णांना आधार देणाऱ्या माधवी स्वत: बेडवर प़डल्या तेव्हा मात्र त्यांचं सांत्वन करायला कोणी नव्हतं. कोरोनाची लक्षणं जाणवताच माधवी पती राज अया यांच्यासोबत मेडिकल सेंटरमध्ये गेल्या होत्या. तेव्हा माधवी आत गेल्यानंतर पती बाहेर कारमध्ये बसले होते. पती राज यांनी मेसेज केला की, एक्स रे झाला का? यावर माधवी यांनी पतीला घरी जाण्यास सांगितलं. त्यानंतर थोड्या वेळानं माधवी यांनी पतीला मेसेज केला. त्यात म्हटलं की, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. घाबरू नका. तुम्ही तुमच्या आईची काळजी घ्या आणि मिनोलीला कॉलेजमधून घेऊन या. आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगी मिनोलीला वाटत होतं की आईला न्युमोनिया झालाय आणि ति लवकर ठीक होऊन परतेल तेव्हा तिला सरप्राइज देऊ. पण घरी परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. आईला न्युमोनिया नाही तर कोरोना झाल्याचं त्यांना समजलं. माधवी यांना घराजवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी मुलगी किंवा पती यांच्यापैकी कोणीही त्यांना पाहू शकलं नाही. माधवी यांच्या मृत्यूच्या आधी तीन दिवस मिनोलीशी बोलल्या होत्या. त्यावेळी मिनोलीनं सांगितलं होतं की,'कॉलेजमध्ये टेन्शन येतं, पण मी घरी आल्यानं चांगलं वाटत आहे.' मिनोलीच्या या बोलण्यावर माधवी यांनी उत्तर दिलं की, 'तु लक्ष केंद्रीत कर' यावर मिनोलीनेही तेच करत आहे असं सांगितलं आणि तु लवकर घरी ये असंही म्हटलं. त्यावेळी माधवी यांनी 'लव्ह यू बेटा, आई लवकर घरी येईल' असं म्हटलं पण पुन्हा ना बोलणं झालं ना त्या परत आल्या. शेवटी त्यांच्या मृत्यूची बातमीच घरी आली. हे वाचा : मुलाच्या बर्थ डेला कोणीच आलं नाही म्हणून पोलीसांनीच दिलं सरप्राइज, पाहा VIDEO राज यांना पत्नी माधवी यांच्याबद्दल सांगताना भावना अनावर झाल्या. ते म्हणाले की,'ती नेहमी आमच्यासाठी उभा राहिली. पण जेव्हा तिला गरज होती तेव्हा आम्ही कोणीच तिच्या जवळ नव्हतो. माधवीचं असं निघून जाणं आमच्यासाठी मोठा धक्का आहे.' मिनोली तर अजुनही विश्वास ठेवायला तयार नाही की आई आपल्याला सोडून गेली. आता मुलीची ही अवस्था पाहून वडिलांची चिंता आणखी वाढली आहे. त्यात संपूर्ण कुटुंब माधवी यांच्या कमाईवर चालत असे त्यामुळे राज यांच्यासमोर आर्थिक अडचणही आहे. हे वाचा : 'डॅडा ना तिकडे राहतो...' पोलीस बापाचा 2 वर्षाच्या मुलाशी निशब्द करणारा संवाद संकलन, संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या