Home /News /videsh /

कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी एमर्जन्सी फंड, भारताकडून तब्बल 7 कोटी रुपयांचं योगदान

कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी एमर्जन्सी फंड, भारताकडून तब्बल 7 कोटी रुपयांचं योगदान

कोरोनाव्हायरसविरोधातील (Coronavirus) रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी सार्क (SAARC) देशांची बैठक घेतली.

    नवी दिल्ली, 15 मार्च :  जगभरात शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाव्हायरसने (Coronavirus) थैमान घातलं आहे. कोरोनाव्हायरसच्या रुग्णांवर उपचार होत आहेत, त्यासाठी अनेक देशांकडे सोयीसुविधा अपुऱ्या पडत आहेत. शिवाय बहुतेक देशांची अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी  COVID- 19 इमर्जन्सी फंडची (Emergency fund) घोषणा केली आहे. COVID- 19 इमर्जन्सी फंडमध्ये प्रत्येक देश जमेल तसं योगदान देईल आणि इतर देशांना त्यामुळे मदत मिळू शकेल. या एमर्जन्सी फंडमध्ये सर्वात आधी भारत आपलं योगदान देणार आहे. भारताने 1 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच तब्बल 7 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाव्हायरसविरोधातील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सार्क (SAARC) देशांची बैठक घेतली. सार्क देशांचे नेते व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे या बैठकीत सहभाही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीचं नेतृत्व केलं. मोदी म्हणाले, "जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाव्हायरसला जागतिक महामारी घोषित केलं. आतापर्यंत आपल्या क्षेत्रात 150 पेक्षाही कमी प्रकरणं आहेत, तरीदेखील आपण सावध राहायला हवं" हे वाचा - हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं! 'कोरोना'शी दोन हात करणाऱ्या मोदी सरकारला सॅल्युट भारत कोरोनाव्हायरसशी कसा लढा देतो आहे, हे सांगताना मोदी म्हणाले, "कोरोनाव्हायरसच्या दहशतीत नव्हे, तर व्हायरसशी लढण्याच्या तयारीत राहा, हाच आमचा मार्गदर्शक मंत्र आहे. आम्ही परदेशातून भारतात आलेल्या लोकांची तपासणी जानेवारीच्या मध्यापासूनच सुरू केली होती आणि प्रवाशांवर हळूहळू प्रतिबंध वाढवले. असं एक एक पाऊल टाकल्याने लोकांमधील भीती निर्माण होत नाही" "ज्यांना संक्रमणाचा धोका जास्त होता, अशा गटापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हा प्रयत्न केले. परदेशातून आतापर्यंत १४०० भारतीयांची सुटका केली आहे. शिवाय भारताशेजारील काही देशांचीही मदत केली आहे", असं मोदींनी सांगितलं. कोरोनाव्हायरसबाबत पंतप्रधान मोदींनी ही बैठक आयोजित केल्यानंतर सार्क देशांनी त्यांचे आभार मानलेत. हे वाचा - मुंबईकरांनो काळजी घ्या, शहरात कोरोनाव्हायरसचे 80 संशयित रुग्ण सार्क देशांनंतर आता पंतप्रधान मोदी जी-20 देशांना कोरोनाव्हायरसविरोधात एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी याबाबत ट्विट केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले, "पंतप्रधान मोदी जी-20 देशांमध्ये सामंजस्य करण्यासाठी उत्सुक आहेत, हे मला माहिती आहे. त्यांचा हा पुढाकार आणि प्रयत्न प्रशंसनीय आहे. ऑस्ट्रेलियादेखील याला समर्थन आहे"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus in delhi, Coronavirus india

    पुढील बातम्या