Home /News /videsh /

ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग! कोरोनाच्या संकटातही किम जोंग यांची मनमानी, PHOTO VIRAL

ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग! कोरोनाच्या संकटातही किम जोंग यांची मनमानी, PHOTO VIRAL

मात्र कोरोनाच्या संकटातही हुकुमशाह किम जोंग उन सार्वजनिक कार्यक्रमात मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता दिसून आले.

    प्योंगयांग, 28 जुलै: तब्बल 8 महिन्यांनी उत्तर कोरियात (North Korea) कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. हा रुग्ण सापडल्यानंतर हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी लगेचच आणीबाणीची घोषणा केली, आणि लॉकडाऊनही जाहीर केले. उत्तर कोरियात सापडलेला कोरोना रुग्ण हा दक्षिण कोरियातून आला असल्याचा दावा किम प्रशासनानं केला आहे. दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या प्योंगयांगमध्ये आतापर्यंत एकही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही आहे. मात्र कोरोनाच्या संकटातही हुकुमशाह किम जोंग उन सार्वजनिक कार्यक्रमात मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता दिसून आले. किम जोंग सोमवारी कोरिया वॉरच्या समाप्तीच्या आठवणीत आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित होते. कोरिया युद्ध संपल्याच्या आनंदात किम जोंग उन यांनी आपल्या लष्करातील अधिकाऱ्यांना पिस्तूल भेट दिल्या, 67 वर्षांपूर्वी झालेल्या या युद्धामुळे लाखो परिवारांना वेगळे केले. एकीकडे किम जोंग शस्त्रे देऊन हा दिवस साजरा करत होते तर लोकं मात्र मास्क घालून रस्त्यावर आनंद साजरा करत होते. वाचा-वुहानमध्ये नेमकं काय घडलं होतं? चीनच्या प्रमुख डॉक्टरांचा सर्वात मोठा खुलासा उत्तर कोरियाच्या माध्यमांनुसार किम यांनी युद्धाच्या समाप्तीसाठी आपल्या अधिकाऱ्यांना डझनभर पिस्तूले भेट दिली. 67 वर्षांपूर्वी झालेल्या या युद्धाचा विना शांतता करार 27 जुलै 1953 रोजी झाला. वाचा-शास्त्रज्ञांना सर्वात मोठं यश, कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडली वाचा-जगात 6 आठवड्यात Corona रुग्णांमध्ये दुप्पट वाढ, WHO ने बोलावली आणीबाणीची बैठक केसोंग शहरात लॉकडाऊन कोरोनाचा पहिला रुग्ण उत्तर कोरियात सापडल्यानंतर दक्षिण कोरियाच्या सीमेजवळ असलेल्या केसोंग शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. उत्तर कोरियाच्या स्थानिक मीडियाने रविवारी, देशात कोरोनाव्हायरस घुसला असल्याचे मान्य केले. याआधी उत्तर कोरियात एकही कोरोना रुग्ण नसल्याचे किम यांनी जाहीर केले होते. कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला रुग्ण बेकायदेशीरपणे उत्तर कोरियात घुसला होता. हा रुग्ण सापडल्यानंतर किम यांनी आणीबाणी जाहीर केली होती.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus, Kim jong un

    पुढील बातम्या