मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मास्कची सूट भोवली! निम्म्या देशाने लस घेतल्यानंतरही अमेरिकेत एका दिवसात आढळले लाखाहून अधिक रुग्ण

मास्कची सूट भोवली! निम्म्या देशाने लस घेतल्यानंतरही अमेरिकेत एका दिवसात आढळले लाखाहून अधिक रुग्ण

मास्कसक्ती मागे घेऊन दोन महिने होत नाहीत तोच अमेरिकेत पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचे घाबरवणारे आकडे समोर आले आहेत. एका दिवसात लाखावर नवीन रुग्ण सापडल्याने पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

मास्कसक्ती मागे घेऊन दोन महिने होत नाहीत तोच अमेरिकेत पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचे घाबरवणारे आकडे समोर आले आहेत. एका दिवसात लाखावर नवीन रुग्ण सापडल्याने पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

मास्कसक्ती मागे घेऊन दोन महिने होत नाहीत तोच अमेरिकेत पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचे घाबरवणारे आकडे समोर आले आहेत. एका दिवसात लाखावर नवीन रुग्ण सापडल्याने पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे.

  वॉशिंग्टन, 30 जुलै: कोरोनापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं ही काळजी घेणं आहे. त्यानंतर लस घेतली की माणूस अधिक सुरक्षित राहतो. अनेक देशांत लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात आली होती. पण काही देशांमध्ये लसीकरणानंतरही मास्क वापरण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मास्कची सक्ती नाही असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र, आता अमेरिकेत पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग (America Corona spread) वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये अमेरिकेत एक लाखांहून अधिक (America Corona cases) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जवळपास अर्ध्या लोकसंख्येचे लसीकरण (America vaccination status) पूर्ण होऊनही ही परिस्थिती असल्याचे पाहून सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) लसीकरण झालेल्या लोकांनाही मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  मास्कच्या सक्तीमध्ये शिथिलता (America mask regulations) दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये अमेरिका पुन्हा सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या (Highest number of corona cases) असलेला देश झाला आहे. अमेरिकेत 49.7 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण होऊनही ही स्थिती आहे. तर, भारतात केवळ 7 टक्के लोकांचं लसीकरण (India corona vaccination) पूर्ण (दोन्ही डोस) झालं आहे. तरीही, आरोग्य मंत्रालयाने (Health ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशातील सुमारे 74 टक्के लोकांनी मास्क वापरणं सोडलं आहे.

  राज्यातील 'हे' 25 जिल्हे होणार UNLOCK, वाचा संपूर्ण यादी

  कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची (Delta Variant) लागण लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाही होत आहे. त्यामुळे, अमेरिकेतली सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) शाळकरी मुलं, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. फ्लोरिडा आणि मिसौरीमध्ये डेल्टा विषाणूचा वाढत चाललेला प्रसार पाहून हा निर्णय घेण्यात आला. सीडीसीचे संचालक डॉ. रॉशेल वॉलेन्स्की यांनी सांगितले, की लस कोरोनावर प्रभावी आहे. मात्र, डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. सर्वात आधी भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या या डेल्टा व्हेरियंटचे (Corona Delta India) रुग्ण आता सगळीकडे दिसू लागले आहेत.

  Coronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट? शास्त्रज्ञांनी केला खुलासा

  भारतातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 91 टक्के, तर अमेरिकेतील 80 टक्के रुग्णांना डेल्टाची (Delta cases in India and America) लागण झाल्याचे समोर आले आहे.

  ही आहे अमेरिका आणि भारतातील स्थिती

  अमेरिका आणि दक्षिण भारतात कोरोनाचा प्रसार अधिक असल्याचे दिसून आले आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये जेवढ्या नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यातील अर्धे म्हणजेच सुमारे 22 हजार रुग्ण हे एकट्या केरळमधील आहेत. तर, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 6 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेबाबत बोलायचं झाल्यास, गेल्या 24 तासांमध्ये फ्लोरिडा राज्यात 38,321 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यासोबतच टेक्सास राज्यात 8,642, कॅलिफोर्नियात 7,731, लुईसियानात 6,818, जॉर्जियात 3,587, यूटाह राज्यात 2,882, अलाबामात 2,667 आणि मिसौरीत 2,414 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.

  जर्मन राष्ट्राध्यक्षांनी घेतले दोन वेगवेगळ्या लशींचे डोस; लस कॉम्बिनेशन फायदेशीर

  कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही एखाद्या व्यक्तीमार्फत कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असे सीडीसीच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये अमेरिकेतील ज्या-ज्या भागांत एकूण लोकसंख्येच्या 8 टक्के किंवा अधिक रुग्ण आढळून आले आहेत; अशा सर्व भागांमधील नागरिकांनी मास्क वापरणं सुरू करावं असं आवाहन सीडीसीने केलं आहे. हेल्थ वर्कर्सनी दर आठवड्याला आपल्या भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा आढावा घ्यावा. या अहवालाच्या आधारे आपल्या भागातील निर्बंधांमध्ये बदल करावेत असेही सीडीसीने सुचवले आहे.

  सध्याच्या पेशंटपैकी बहुतेकांनी घेतलेली नाही लस - बायडेन यांचा दावा

  ‘युनायटेड फूड अँड कमर्शिअल वर्कर्स’ इंटरनॅशनलचे अध्यक्ष मार्क पेरोन म्हणतात, की कोरोना प्रसार थांबवण्यासाठी मास्क हाच एकमेव उपाय आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) म्हणाले, ‘लसीकरणामुळे देशातील कोरोना मृत्युदर बराच कमी झाला आहे. त्याचबरोबर ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि सध्या ज्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यापैकी बहुतेक जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. तरीही नागरिकांना सावध राहणं व संसर्ग रोखण्यासाठीचे नियम पाळणं गरजेचं आहे.’

  First published:
  top videos