मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आता संसारात शिरला कोरोना! व्हायरसमुळे 300हून अधिक जोडप्यांनी केला घटस्फोटासाठी अर्ज

आता संसारात शिरला कोरोना! व्हायरसमुळे 300हून अधिक जोडप्यांनी केला घटस्फोटासाठी अर्ज

एकीकडे जगात थैमान घालणारा कोरोना आता संसारही तोडतोय, घरात बंदिस्त असल्यामुळे जोडप्यांमध्ये वाद होत आहेत.

एकीकडे जगात थैमान घालणारा कोरोना आता संसारही तोडतोय, घरात बंदिस्त असल्यामुळे जोडप्यांमध्ये वाद होत आहेत.

एकीकडे जगात थैमान घालणारा कोरोना आता संसारही तोडतोय, घरात बंदिस्त असल्यामुळे जोडप्यांमध्ये वाद होत आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde

बीजिंग, 16 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे सर्व देशांची अर्थव्यवस्था खिळखिळीत झाली आहे. साऱ्या जगात थैमान घातलेला हा व्हायरस आता लोकांच्या संसारातही शिरत आहे. कोरोनामुळे चीन, इराण आणि इटलीमध्ये लोकांना घरात बंदिस्त करण्याची वेळ आहे. हेच जोडप्यांमधील घटस्फोटाचे कारण ठरत आहे.

चीनच्या चिचुआन प्रांतात एका महिन्यात 300 हून अधिक जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, कोरोनाव्हायरसमुळे बहुतेक लोक घरात कैद आहेत, यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रकार वाढत आहेत. या कारणामुळे जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केले आहे.

वाचा-Coronavirus ची जगभरातली खरी आणि ताजी माहिती एका क्लिकवर; Covid-19 ट्रॅकर लाँच

दाझौ भागातील सरकारी अधिकारी लू शिजुन यांनी, " सध्याच्या घडीला शेकडो जोडपे आपले लग्न मोडण्याच्या विचारात आहेत. आतापर्यंत घटस्फोटासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. पती-पत्नी सतत एकमेकांसोबत असल्यामुळे त्यांच्यात भांडणं होत आहेत. त्यामुळं 300हून अधिक जोडप्यांनी अर्ज दाखल केला आहे", अशी माहिती दिली. सध्या कोरोनाव्हायरसमुळे कार्यालय एका महिन्यासाठी बंद असल्यामुळे ही सर्व प्रकरणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहेत.

वाचा-कोल्हापूरच्या रुग्णाचा खरंच कोरोनामुळे झाला मृत्यू, वाचा काय आहे सत्य?

इटलीमध्ये इंटरनेट वापरात वाढ

चीननंतर कोरोनाच सर्वात जास्त फटका इटलीला बसला आहे. त्यामुळं इटलीमध्येही शटडाऊन करण्यात आले आहे. इटलीतही सध्या लोकं घरामध्ये कैद आहेत. याच कारणामुळे येथील इंटरनेट सेवेचा वापर 70 % वाढली आहे. घरात बसून लोक वेबसीरिज आहे आणि ऑनलाईन गेम खेळण्यात वेळ घालवत असल्यामुळे इंटरनेटचा वापर दुपटीने वाढला आहे.

वाचा-'हॅलो...माझ्या घरात पोहचला कोरोना, आता काय करू सांगा?'

भीतीदायक परिस्थिती

वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार सध्या इटली, इराण आणि स्पेनमधील परिस्थिती चिंताजनक आहे. इराणमधील मृतांची संख्या वाढून 724 झाली आहे. तर दुसरीकडे स्पेनमध्ये एका दिवसात 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मृतांचा आकडा 14 झाला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात सहा हजारहून अधिका लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 1 लाख 59 हजार 844 संसर्गित असल्याचे आढळले आहे.

First published:

Tags: Corona