बीजिंग, 29 मार्च - जगभरात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) हजारो रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक या व्हायरसच्या विळख्यात आहेत. चीनमधून (China) हा व्हायरस जगभर पसरला. आता या व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे.
अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, चीनच्या वुहान शहरात राहणाऱ्या 57 वर्षांच्या वेई गायक्सियन या महिलेला कोरोना संक्रमणाचा पेशंट झिरो (patient zero) म्हटलं आहे. ही महिला कोरोनाव्हायरसची पहिली शिकार मानली जाते आहे. संसर्ग झाल्यानंतर ही महिला महिनाभर रुग्णालयात होती. जानेवारीत ती पूर्णपणे बरी झाली.
रिपोर्टनुसार वेई हुन्नान प्रांतातील मासे बाजारात मासे विकत होत्या. 10 डिसेंबरला त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती.
हे वाचा - डोळे लाल होणं हे Coronavirus चं लक्षण आहे का?
मिररमधील एका वृत्तानुसार, वेईला सुरुवातीला आपल्याला सामान्य फ्लू असल्याचं वाटलं, कारण त्यांना सर्दी-खोकला होता. त्या एका स्थानिक दवाखान्यात गेल्या, जिथं त्यांना फ्लूची औषधं देण्यात आली. जेव्हा या औषधांचा परिणाम झाला नाही, तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या वुहानच्या इलेवंथ रुग्णालयात गेल्या. तिथंही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही, त्यानंतर त्यांना 16 डिसेंबरला वुहानमधील सर्वात मोठं असलेलं वुहान युनियन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर फक्त वेईच नाही तर हुन्नान बाजारात काम करणारे बहुतेक लोकं अशा तक्रारी घेऊन येत असल्याचं रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आलं. डिसेंबरअखेरपर्यंत डॉक्टरांना या संसर्गजन्य आजाराबाबत माहिती मिळाली आणि सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं.
पेशंट झिरोबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. लँसेट मेडिकल जनरलनुसार COVID-19 चा पहिला रुग्ण 1 डिसेंबरला चीनच्या वुहानमध्ये दिसून आला होता. वेई जेव्हा रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा त्यांनी आपल्याला हा आजार मीट मार्केटमधील सार्वजनिक शौचायल वापरल्यानंतर झाल्याचा दावा केला. वेई आता या आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्यात.
हे वाचा - लॅपटॉप, कॉम्प्युटरवरही असू शकतो Coronavirus, काय आहे सत्य? मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.