युरोपात कहर! Coronavirus ने चीनपेक्षाही इटलीत घेतले जास्त बळी

युरोपात कहर! Coronavirus ने चीनपेक्षाही इटलीत घेतले जास्त बळी

चीनमध्ये (China) कोरोनाव्हायरसची (Coronavirus) नवी प्रकरणं नाहीत. मात्र युरोपात (Eropue) हा व्हायरस झपाट्याने पसरतो आहे. इटलीत (Italy) चीनपेक्षाही जास्त मृत्यू झालेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आता युरोपात (Eropue) थैमान घातलं आहे. इटलीत (Italy) चीनपेक्षाही (China) जास्त बळी घेतलेत. जगातील एकूण कोरोनाव्हायरसच्या रुग्णांपैकी 67 टक्के प्रकरणं युरोपात आहेत. त्यामुळे युरोप हा आता कोरोनाव्हायरसचा नवा केंद्रबिंदू झाला आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसचे 1,38,840 अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी 93,396 युरोपात आहेत. इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्स हे देश कोरोनाव्हायरने सर्वाधिक प्रभावित आहेत.

हे वाचा - 'तो' मृत्यू Coronavirus मुळे नाही; पाचव्या बळीबद्दल सरकारने दिलं स्पष्टीकरण

कोरोनाव्हायरसच्या मृतांचा सर्वाधिक आकडा आतापर्यंत चीनमध्ये होता. मात्र आता चीनपेक्षा इटलीत सर्वाधिक बळी गेलेत. 24 तासांत 427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांची संख्या 3,405 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये 3,245 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इटली प्रशासनाने गुरुवारी सांगितलं इटलीतील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 41,035 झाली आहे. नवी प्रकरणं 15 टक्क्यांनी वाढलीत.

हे वाचा - 'कोरोना'पासून बचावासाठी Google चं खास Doodle, पाहा व्हिडीओ

इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोनाव्हायरचे 15,485 आणि जर्मनीमध्ये 14,387 रुग्ण आहेत. 8,268 रुग्ण असलेला फ्रान्स हा कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे इटली, फ्रान्स आणि जर्मनीमध्येही लॉकडाऊन आहे.

चीननंतर हा व्हायरस इतर देशांमध्ये पसरला. चीनमध्ये या व्हायरसचे नवे रुग्ण फारसे नाहीत, मात्र इतर देशांमध्ये याचं प्रमाण आता वाढताना दिसतं आहे.

हे वाचा - चीन म्हणाला, 'कोरोना' वुहानचा नव्हे; मग नेमका कुठून आला व्हायरस?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2020 05:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading