Home /News /videsh /

जगाला आता 'डिसीज-एक्स' या नव्या घातक विषाणूचा धोका

जगाला आता 'डिसीज-एक्स' या नव्या घातक विषाणूचा धोका

कोरोना, बर्ड फ्लू आणि इबोलानंतर आणखीन एका व्हायरसचा इशारा देण्यात आला आहे. हा व्हायरस प्राण्यांपासून पसरत असल्याचं सांगितलं जात आहे.

    नवी दिल्ली, 04 जानेवारी : जगभरात कोरोना(Covid 19) व्हायरस धुमाकूळ घालत आहे. अनेक देशांमध्ये या व्हायरसचे नवीन रूप समोर येत आहे. अनेक देशांमध्ये लसीकरण सुरु झालं असून याच्या नवीन रूपामुळे अनेक देशांनी धसका घेतला आहे. लसीकरण(Vaccination) सुरु झालं असताना आणखी एका नवीन व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. वैज्ञानिक जीन-जैक्‍स मुयेम्‍बे ने तामफूम (Professor Jean-Jacques Muyembe Tamfum) यांनी याविषयी इशारा दिला आहे. इबोला(Ebola Virus) या आफ्रिकेतील व्हायरसचा शोध लावणाऱ्या या वैज्ञानिकाने या नवीन व्हायरसविषयी इशारा दिला असून हा व्हायरस एबोलाप्रमाणेच घातक असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे. जीन-जैक्‍स मुयेम्‍बे ने तामफूम (Professor Jean-Jacques Muyembe Tamfum) यांनी CNN ला दिलेल्या मुलाखतीत या व्हायरसविषयी माहिती सांगितली असून इबोला(Ebola Virus) प्रमाणे असणाऱ्या या व्हायरसला त्यांनी Disease X नाव दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार कांगोमध्ये हा व्हायरस असून जगभरातील अनेक देशांमध्ये देखील हा व्हायरस आहे. प्रोफेसर जीन यांनी 1976 मध्ये इबोला व्हायरसचा शोध लावला होता. या मुलाखतीत बोलताना त्यांनी आपण व्हायरसच्या जगामध्ये राहत आहोत असं म्हटलं. अजून आणखी घातक व्हायरस येणार असून आपल्याला यापासून सावध राहण्याची गरज आहे. येणाऱ्या घातक व्हायरसपासून मोठ्या प्रमाणात धोका असून मोठ्या संख्येने हानी होऊ शकते. कांगोमध्ये एका महिलेला ताप (Haemorrhagic) आल्यानंतर तिची इबोला टेस्ट करण्यात आली. तिची इबोला टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांना या महिलेला Disease X आजार असल्याची भीती वाटत आहे. त्यामुळे आता या महिलेवर लक्ष असून लवकरच या महिलेचे पुढील रिपोर्ट देखील समोर येतील. WHO ने या आजाराला म्हटलं काल्पनिक जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) माहितीनुसार हा आजार काल्पनिक आहे. खूप कमी वेळात हा आजार जगभरात पसरण्याची भीतीदेखील जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त(WHO) केली. इबोला(Ebola Virus) व्हायरसचा शोध लावताना प्रोफेसर जीन यांनी महिलेच्या रक्ताचा नमुना घेतला होता. या व्हायरसचा शोध लागल्यानंतर आफ्रिकी देशांमध्ये खूप मोठा धुमाकूळ घातला होता. या व्हायरसचा प्रकोप सुरु झाल्यानंतर यामबूकू म‍िशन हॉस्पिटलमध्ये 88 टक्के रुग्ण आणि 80 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. जीन यांना नमुन्यामध्ये व्हायरसारखा घटक आढळला आहे. त्यामुळे आता नवीन व्हायरस येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. हे वाचा-मुलीला पाहताच आईनं हसत सोडला जीव; कोरोनाग्रस्त मायलेकीच्या भेटीचा शेवटचा क्षण जगभरात प्राण्यांमधून मोठ्या प्रमाणात व्हायरस पसरत असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटनमधील एडिनबर्ग विश्‍वविद्यालयाच्या मते जगभरात तीन ते चार वर्षांनी नवीन व्हायरस येत असतात. जंगली प्राण्यांपासून विविध व्हायरस पसरण्याची भीती आहे. एडिनबर्ग विश्‍वविद्यालयातील प्रोफेसर मार्क वूलहाउस यांच्या मते वुहानसारख्या मार्केटमध्ये जंगली प्राणी कापून विकले जातात. या प्राण्यांमधूनच 'Disease X' पसरू शकतो. त्यामुळे जंगली प्राण्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. प्राण्यांमधून पसरत आहेत आजार जगभरात विविध प्रकारचे व्हायरस पसरत असतात. यामध्ये जास्त प्रमाणात प्राण्यांपासून व्हायरस पसरत आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचा समावेश आहे. रेबीज, इंफ्लुएंजा आणि इतर अनेक प्राण्यांमधून मानवामध्ये पसरले आहेत. उंदीर आणि इतर अनेक किड्यांमुळे विविध व्हायरस मानवामध्ये आलेलं आहेत. या प्राण्यांना मारल्यामुळं किंवा त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट केल्याने त्यांचा थेट संबंध माणसाशी आल्यानंतर त्यांच्यापासून विविध व्हायरस माणसांमध्ये येतात. उंदीर आणि वटवाघळांसारख्या प्राण्यांमधून विविध व्हायरस मानवांमध्ये आलेले आहेत. कोरोना लस आल्यानंतर आता आणखी एका व्हायरसने जगभरातील नागरिकांचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असून जंगली प्राण्यांची शिकार किंवा खाद्य म्हणून वापर करताना दहावेळा विचार करणे गरजेचे आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Lifestyle

    पुढील बातम्या