coronavirus : लॉकडाऊनमध्येही या देशात होणार दारूची होम डिलिव्हरी

लोकांना आता सर्वात जास्त याची गरज असल्यानं हा निर्णय घेतल्याचं संयुक्त अरब अमीरातमधील दुबई सरकारचं म्हणणं आहे.

  • Share this:

दुबई, 09 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. 15 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 80 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात दारू विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अनेक जण दारूसाठी आसूसले आहेत. अशावेळी दारूची दुकानं फोडणं, दारू चोरणं काहीच नाही तर आत्महत्या करण्यापर्यंतचे प्रकारही ऐकायला मिळाले आहेत. मात्र आता दारू विक्रीवरील बंदी उठवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आता दारू थेट घरपोहोच करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दुबई इथे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मद्याची होम डिलिव्हरी करण्यासाठी सरकारनं परवानगी दिली आहे. लोकांना आता सर्वात जास्त याची गरज असल्यानं हा निर्णय घेतल्याचं संयुक्त अरब अमीरातमधील दुबई सरकारचं म्हणणं आहे.

हे वाचा-Lockdown मध्ये गुगलवर काय सर्च करत आहेत भारतीय, वाचून बसेल धक्का

दुबईतील मद्य विकणाऱ्या प्रमुख विक्रेत्यांना होम डिलिव्हरी करण्याची परवानगी मिळाली आहे. युरोमॉनिटर इंटरनॅशनल मार्केटबाबत अभ्यास करताना विश्लेषक राबिया यास्मीन म्हणाल्या, "या क्षेत्रातील लक्झरी हॉटेल्स आणि बारवर लॉकडाऊनमुळे वाईट परिणाम झाला आहे आणि त्याचा थेट परिणाम अल्कोहोलच्या वापरावर झाला आहे." दुबईमध्ये 24 तास लॉकडाउन आहे, ज्यामध्ये लोकांना किराणा दुकानात जाण्यासाठीही पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. दोन वेबसाईटवरून ही मद्यविक्री करण्यासाठी सरकारनं परवानगी दिली आहे. या वेबसाईटवरून दारू ऑर्डर केल्यानंतर ती घरपोहोच येणार आहे.

लग्न सोहळे आणि तलाकलाही लॉकडाऊन काळात परवानगी नाही

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हा संसर्ग वाढू नये म्हणून लग्न सोहळे किंवा तलाख यासोबतच इतर कार्यक्रमही करण्यास सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची दोन हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये सामील नागरिक वगळता सर्व नागरिक आणि तेथील रहिवाशांना घर सोडण्याची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे.

हे वाचा-कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी असा आहे नरेंद्र मोदींचा ‘मास्टर प्लॅन’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2020 09:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading