VIDEO : तरुणीने खाल्ले वटवाघूळ, त्यामुळे देशभरात पसरला खतरनाक कोरोना व्हायरस?

VIDEO : तरुणीने खाल्ले वटवाघूळ, त्यामुळे देशभरात पसरला खतरनाक कोरोना व्हायरस?

आतापर्यंत या व्हायरसमध्ये चीनमध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 830 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी :  चीनमध्ये आणि तिथून जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरस भारतात पोहोचला आहे. कोरोना व्हायरसचे (coronavirus) 2 संशयित रुग्ण मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आतापर्यंत या व्हायरसमध्ये चीनमध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 830 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.

याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कोरोन व्हायरस हा चीनमधील एका तरूणीमुळे पसरला, असा दावा करण्यात आला आहे. या तरुणीने वटवाघूळ खाल्लं होतं.

डेली मेलच्या वृत्तानुसार, ही तरुणी वटवाघूळ खात  आणि त्याचं सूप पित असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वटवाघूळ खाल्यामुळे या तरुणीला व्हायरसची लागण झाली.  तर दुसरीकडे चीनमधील शास्त्रांनीही कोरोना व्हायरस हा साप आणि वटवाघुळ खाल्यामुळे पसरला असल्याचा दावा केला आहे.

चीनमधील वुहानमध्ये साप, वटवाघुळ, कुत्रा, पक्ष्यांच्या मासांची सर्रासपणे विक्री होती आणि हॉटेलमध्ये खाल्लंही जातं. शास्त्रांनी असंही म्हटलं आहे की, वटवाघुळापासून पसरलेला  SARS (Severe Acute Respiratory Syndrome) हा व्हायरस सापापासून लोकांमध्ये पसरला आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये हाहाकार उडाला आहे. वुहानसह 9 शहरं बंद करण्यात आली आहे. वुहानमध्ये 700 पेक्षा जास्त अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणं

सर्दी

ताप

खोकला

घसा खवखवणे

श्वास घेताना त्रास

डोकेदुखी

कोरोना हा काय प्रकार आहे?

कोरोना वायरस हे नाव व्हायरसच्या आकारावरून पडलं आहे. एखाद्या मुकुटाप्रमाणे, प्रभेसारखा दिसणारा हा व्हायरस आहे आणि तो हवेमार्फत पसरतो.  श्वसनप्रणाली आणि गॅस्ट्रोइन्टेस्टाइनवर परिणाम करतो.  याआधी severe acute respiratory syndrome corona virus (SARS-CoV) आणि Middle East respiratory syndrome corona virus (MERS-CoV) यांनी गेल्या 17 वर्षात शेकडो लोकांचे बळी घेतलेत.  जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधील या कोरोना व्हायरसला 2019-nCoVअसं नाव दिलं आहे.

MERS-CoV आणि SARS-CoV या कोरोना व्हायरसला झोनोटिक व्हायरल डिसीज म्हटलं जातं (zoonotic viral diseases) एखाद्या व्यक्तीला या आजाराची लागण थेट प्राण्यांमार्फत होते. मात्र नवीन क्रोनोव्हायरस व्यक्ती व्यक्तींमध्ये पसरत आहे, त्यामुळे गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे.

First published: January 24, 2020, 6:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या