Coroanvirus भीषण वास्तव! मायभूमीत यायच्या प्रतीक्षेत आहेत 3486 भारतीयांचे मृतदेह

Coroanvirus भीषण वास्तव! मायभूमीत यायच्या प्रतीक्षेत आहेत 3486 भारतीयांचे मृतदेह

Coronavirus परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे परदेशात मृत्युमुखी पडलेल्या हजारो भारतीयांचे मृतदेह मायभूमीत अंत्यसंस्कार व्हायची वाट पाहात पडून आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आकडेवारी अंगावर शहारे आणेल.

  • Share this:

 नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : Coronavirus मुळे होणाऱ्या संसर्गाची भीती वाढतेच आहे. कोरोना मृत्यूनंतर संसर्गाची भीती असल्याने मृतदेहाचे अंत्यसंस्कारसुद्धा कुटुंबीयांना पाहता येतीलच असं नाही. पण ज्यांचा कुठल्या इतर कारणाने मृत्यू झाला आहे, त्यांचं अंत्यदर्शनही ते परगावी किंवा परदेशात असतील तर दुरापास्त झालं आहे. परदेशात असताना मृत्यू आलेल्या हजारो भारतीयांचे मृतदेह अजूनही मायभूमीच्या प्रतीक्षेत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेली यासंबंधीची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आहे. आपल्या देशातून मोठ्या प्रमाणावर नागरिक नोकरी धंद्यासाठी इतर देशात स्थंलातर करतात. मात्र कोरोना परिस्थितीमुळे अंत्यसंस्कारासाठीही मायभूमीचं दर्शन होत नसल्याचं चित्र आहे.

1 फेब्रुवारी ते 15 ऑगस्टदरम्यान फक्त 10 देशांमध्ये 5286 भारतीयांचा मृत्यू झाला. त्या वेळी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होती. देशांतर्गतही लॉकडाऊन होता. या 5 हजारांपैकी अगदी थोड्यांचे शव मायभूमीत पोहोचू शकली. प्रतीक्षेत असलेल्यांचे मृतदेह मायदेशी आणायचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

कोरोनाची साथ संपूर्ण जगभरात पसरली आहे. आतापर्यत कोरोनामुळे अनेक लोकांनी जीव गमावला आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या 5286 भारतीयांच्या मृत्यूपैकी सर्वाधिक मृत्यू अरब जगात गेलेल्यांचे आहेत. कोरोनाची भीती आणि लॉकडाउनमुळे खूप कमी भारतीयांची शव अंत्यसंस्कारासाठी भारतात आणली गेली. सौदी अरेबियात झालेल्या 2360 मृत्यूंपैकी फक्त 357 मृतदेह भारतात येऊ शकले. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 1441 मृत्यू झाले. त्यापैकी फक्त 704 शव मायभूमीत दफन होऊ शकली. कुवैतमधून - 694 पैकी 356 मृतदेह भारतात आणला आले. ओमानमधून 336 पैकी 163 मृतदेह भारतात आणले गेले, कतारमधून 238 पैकी 148, बहारीनमध्ये 176पैकी फक्त 64 तर चीनमध्ये झालेल्या 20 भारतीयांच्या मृत्यूपैकी केवळ 6 मृतदेह भारतात आणणं शक्य झालं.

या कोरोना कहर आणि लॉकडाऊन काळात 5286 पैकी फक्त 1807 मृतदेह भारतात आणता आले. यातील काही जणांच्या कुटुंबीयांची इच्छा असूनही त्यांच्या आप्ताचं अंत्यदर्शन घेता आलं नाही. पण केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, यातल्या काहींच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसारच मायदेशी शव आणण्याऐवजी त्या त्या देशात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरब राष्ट्रातील नियमाप्रमाणे तिथे मृत्यू पावणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पुरलं जातं. अन्य धर्मीयांच्या प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करायला परवानगी मिळेलच असं नाही. अशा वेळी आप्तांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मायदेशी न्यायला नातेवाईकांचं प्राधान्य असतं. पण लॉकडाऊनमुळे ते सोपं राहिलेलं नाही.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 22, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading