कोरोनाचं थैमान: जगभरातल्या मृतांचा आकडा 21 हजारांवर, 5 लाख लोक पॉझिटिव्ह

कोरोनाचं थैमान: जगभरातल्या मृतांचा आकडा 21 हजारांवर, 5 लाख लोक पॉझिटिव्ह

बाधितांचा आकडा लवकरच 5 लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 26 मार्च: जगभर कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चीननंतर आता इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये झापाट्याने त्याचा प्रसार होत आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा 21 हजारांवर गेला आहे. तर 4 लाख 72 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून हा आकडा लवकरच 5 लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज   Johns Hopkins Universityच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मृत्यूची संख्या जास्त असलेले पहिले 5 देश

 Italy - 7,503

Spain 3,647

Hubei China - 3,169

 Iran - 2,077

 France - 1,331 deaths

अशी आहे बाधितांची आकडेवारी

81,736 China

74,386 Italy

69,197 US

49,515 Spain

37,323 Germany

कोरोनामुळं साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी आता एक आनंदाची बातमी आली आहे. नोबेल पारितोषिक विजेते आणि स्टॅनफोर्ड बायोफिझिक तज्ज्ञ मायकल लेव्हिट यांनी कोरोनाव्हायरस लवकरच मरेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

मायकल यांच्या मते, जगातील कोरोना विषाणूचा सर्वात वाईट टप्पा आधीच संपला आहे. कोरोनाच्या मृतांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत 21 हजार लोकांचा मृत्यू झाला असला तरी 1 लाखांहून अधिक लोक निरोगीही झाले आहेत. त्यामुळं कोरोनावर मात करू शकतो, अशी परिस्थती निर्माण झाली आहे.

वाचा-पिंपरीकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाचे 3 रुग्ण झाले ठणठणीत बरे तर....

लॉस एंजेलिस टाईम्सशी केलेल्या संभाषणात मायकल यांनी, "परिस्थिती जितकी भीतीदायक वाटत आहे तेवढी नाही आहे. चीनमध्ये 78 हजार लोक निरोगी झाले आहे. म्हणजे कोरोना विषाणू लवकरच मरू शकतो, यावर विश्वास आहे", असे सांगितले. अनेक आरोग्य तज्ञांचा असा दावा केला होता की, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी चीनला बराच काळ लागेल, मात्र गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

 

 

First published: March 26, 2020, 4:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading