Coronavirus : दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढताच, आतापर्यंत 1700 जणांचा मृत्यू

Coronavirus : दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढताच, आतापर्यंत 1700 जणांचा मृत्यू

चीनमधील हुबेई राज्यात कोरोनाव्हायरसमुळे आणखी 100 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला असून मृतांची संख्या 1700 वर गेली आहे.

  • Share this:

वुहान, 17 फेब्रुवारी : चीनमधील कोरोनाव्हायरसने जगातील अनेक देशांना विळखा घातला आहे. देशभरात अनेकांना या व्हायसरमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. अनेकांना या व्हायरसची लागण झाल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यातच आता चीनमधील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. lतर आणखी 70 हजार जणांना या व्हायरसची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे. तर दुबईमध्ये व्हायरसने बाधित नवे 1 हजार 933 रुग्ण समोर आले आहेत.

चीन देशात जवळपास 70 हजार 400 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. या रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण चीनमधील हुबई राज्यामधील आहेत. याच राज्यातून कोरोनाव्हायरस पसरायला सुरुवात झाली होती. मात्र आधी झालेल्या संक्रमणाच्या तुलनेत या आठवड्यात कमी लोकांना व्हायरसची लागण झाली असल्याचं कळत आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा 12 सदस्यीय गट चीनला रवाना झाला आहे. या व्हायरसविषयी अधिक माहिती घेतली जात असल्याचंही सांगण्यात येत आहे.

गोष्ट एका लग्नाची! 50 वर्षाच्या लिव्ह इन रिलेशन नंतर केलं लग्न

डायमंड प्रिंसेस जहाजावर कोरोना व्हायरस सापडल्याने त्या जहाजाला जपानच्या किनाऱ्य़ावर वेगळं उभं करण्यात आलं आहे. या जहाजावरील संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून ती आता 355 वर गेली आहे. जपानच्या आरोग्य मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अमेरिका या डायमंड प्रिंसेस जहाजावरून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जहाज टोकियोजवळील योकोहामा बंदरावर 5 फेब्रुवारीपासून रोखण्यात आला आहे.

हाँगकाँगने सांगितल्याप्रमाणे या डायमंड प्रिंसेस जहाजावरील 330 हाँगकाँगच्या नागरिकांना चार्टर्ड विमानाने आणलं जाणार आहे. तर कॅनडानेही जहाजमधील नागरिकांना बाहेर काढणार असल्याची घोषणा केली आहे.

मोहन भागवतांच्या घटस्फोटाच्या वक्तव्यावर भडकली सोनम कपूर, म्हणाली...

डायमंड प्रिंसेस जहाजावरील व्हायरसच संक्रमण थांबवण्यासाठी जपान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या व्हायरसमुळे जपानवर एका अर्थाने संकट कोसळल आहे. हे जहाज फेब्रुवारीला 50 देशांमधील 3 हजार 700 प्रवाशांना घेऊन जपानच्या किनाऱ्यावर आला होता. जेव्हा अधिकाऱ्यांनी प्रवाशांची निदान चाचणी केली. त्यावेळी एका प्रवाशाला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यानंतर हे जहाज जपानच्या किनाऱ्यावरच थांबवण्यात आलं.

कोरोनाव्हारसचा धोका काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. प्रत्येक देश कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अभिनव बिंद्रांच्या बायोपिकमध्ये झळकणार ही बाप-लेकाची जोडी, चाहते उत्सुक

First published: February 17, 2020, 12:51 PM IST

ताज्या बातम्या