भयंकर ! कोरोना फुफ्फुसांची अक्षरश: लावतोय वाट;  X-ray पाहाल तर बसेल धक्का

भयंकर ! कोरोना फुफ्फुसांची अक्षरश: लावतोय वाट;  X-ray पाहाल तर बसेल धक्का

जीवघेणा कोरोनाव्हायरस (Coronavirus) आपल्या फुफ्फुसांची (Lung) काय हालत करतो आहे, याची कल्पना हा एक्स-रे (X-ray) पाहून तुम्हाला येईल.

  • Share this:

लंझाऊ, 13 फेब्रुवारी : फक्त चीनमध्येच (China) कोरोनाव्हायरसने (Coronavirus) तब्बल 1,300 जणांचा बळी घेतला आहे. तर जगभरात जवळपास 45,000 जणांना याची लागण झाली आहे. या कोरोनाव्हायरसची लक्षणं न्युमोनियाशी (Pneumonia) मिळतीजुळती असली तरी तो किती भयंकर आहे, याची कल्पना आता हा फोटो पाहून तुम्हाला येईल.

कोरोनाव्हायरस नेमका फुफ्फुसांवर कसा आणि काय परिणाम करतो आहे, हे या चीनमधील एका रुग्णाच्या X-ray तून दिसून येईल. कोरोना फुफ्फुसांची अक्षरक्ष: वाट लावतो आहे. हा एक्स-रे पाहून अगदी धक्काच बसेल. चीनच्या लंझाऊतील एका रुग्णालयात दाखल असलेल्या ३३ वर्षीय कोरोनाव्हायरसच्या रुग्णाच्या छातीचा एक्स-रे घेण्यात आला. यानंतर धक्कादायक असं चित्र समोर आलं. सार्सप्रमाणेच कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत आहेत.

Photo - Journal Of Radiology

Photo credit - Journal Of Radiology

जर्नल ऑफ रेडिओलॉजीच्या मते,

डॉक्टरांनी दाखवलेल्या या एक्स-रे रिपोर्टमध्ये फुफ्फुसाच्या खालील भागात काही डाग दिसत आहेत. डॉक्टरांनी याला Ground glass opacity म्हटलं आहे.

रेडिओलॉजिस्टनी सांगितल की, जेव्हा त्यांनी हे डाग झूम करून पाहिले तेव्हा ते काचेच्या तुकड्यांप्रमाणे दिसत होते. या अर्थ तिथं काहीतरी तरल पदार्थ जमा झालं आहे.

न्युमोनिया आणि कोरोनाव्हायरसची लक्षणं सारखी दिसत असली तरी न्युमोनियाच्या तुलनेत कोरोनाव्हायरस खूप झपाट्याने पसरतो आहे आणि अँटिबायोटिक्सचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही आहे, अशी आणखी एक धक्कादायक माहिती रिपोर्टमध्ये समोर आली आहे.

Photo credit - Journal Of Radiology

Photo credit - Journal Of Radiology

तुम्हाला कोरोनाव्हायरस झाला की नाही हे कसं समजेल?

कोरोनाची लक्षणं ही सर्वसामान्य लक्षणांसारखीच आहेत. सुरुवातीला डोकेदुखी, नाक वाहणं, खोकला, घसा खवखवणे, ताप, शरीरात थकवा, शिंका येणे अशी लक्षणं दिसून येतात आणि हळूहळू रुग्णांना न्युमोनिया असल्यासारखं वाटतं. कोरोनाव्हायरस फुफ्फुसावर हल्ला करतो आणि त्यामुळे कमजोरी येते. शरीर इतकं कमजोर होतं, की कोरोनापासून वाचणं अशक्य होतं.

अन्य बातम्या

पुरुष की महिला कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला? संशोधनात समोर आली धक्कादायक

PM मोदींना मदतीसाठी आर्त हाक घालणाऱ्या त्या जपानी क्रुझवरील भारतीयांना 'कोरोना'

तुम्हीही असू शकता 'कोरोना'चे Super spreader! विषाणू वेगाने पसरायचं भयंकर कारण

First published: February 13, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या