Coronavirus पेक्षा गंभीर समस्यांना तयार राहा, WHO च्या प्रमुखांचा इशारा!

Coronavirus पेक्षा गंभीर समस्यांना तयार राहा, WHO च्या प्रमुखांचा इशारा!

‘संपूर्ण जगाला वेठीस धरणारी कोरोना व्हायरस ही जगातील अंतिम महामारी नाही', असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : संपूर्ण जगाला 2020 या वर्षात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फटका बसला. एकही देश या संसर्गजन्य आजाराच्या तडाख्यातून सुटला नाही. वर्षातील बहुतेक काळ लॉकडाऊनमध्ये (Lockdown) घालवल्यानंतरही जगाची यामधून सुटका झालेली नाही. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांची धास्ती आणखी वाढली आहे.

‘संपूर्ण जगाला वेठीस धरणारी कोरोना व्हायरस ही जगातील अंतिम महामारी नाही', असा इशारा  वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेसियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिला आहे. ‘हवामानातील बदल (Climate Change) आणि पशू कल्याणाच्या समस्यांवर उत्तर शोधल्याशिवाय सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत’, असं त्यांनी सांगितले आहे.

आंतरराष्ट्रीय महामारी दिवसाच्या (World Pandemic Day) तयारीच्या निमत्तानं टेड्रोस यांचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी वाट्टेल तितका पैसा खर्च करुनही पुढील महामारीचा सामना करण्याची तयारी न करणाऱ्या देशांवर टीका केली आहे. Covid-19 ने शिकवलेला धडा जगानं आत्मसात करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

जगाची 'ही' सवय धोकादायक!

“आपण एका समस्येचं उत्तर शोधण्यासाठी पैसा खर्च करतो ती समस्या सुटल्यानंतर त्या समस्येचा सर्वांना विसर पडतो. पुढची समस्या निर्माण होऊ नये म्हणून आपण काहीही करत नाही. हे खूप धोकादायक आणि समजण्याच्या पलिकडं आहे,’’ अशी टीका त्यांनी केली.

‘आरोग्य विषयक पहिला वार्षिक जागतिक रिपोर्ट सप्टेंबर 2019 मध्ये प्रकाशइत झाला होता. या रिपोर्टनंतर काही महिन्यातच जगभर कोरोना व्हायरसचा फैलाव झाला. संभाव्य विनाशकारी महामारीचा सामना करण्यासाठा जग तयार नाही. त्याचबरोबर ही जगातील शेवटची महामारी नाही, असं इतिहास सांगतो, असे या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले होते’, याची आठवणही WHO प्रमुखांनी यावेळी करुन दिली.

या महामारीने मनुष्य, हवामान आणि अन्य प्राणी यांच्यातील परस्पर संबंधावर प्रकाश टाकला आहे. मानवी आरोग्य चांगले करण्याच्या प्रयत्नांकडं आजवर दुर्लक्ष करण्यात आले. मनुष्य आणि प्राण्यांमधील परस्पर वातावरण आणि हवामान बदलाची समस्या यामुळे जगाला अजूनही धोका असल्याचं भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे.

Published by: News18 Desk
First published: December 27, 2020, 11:53 AM IST

ताज्या बातम्या