'कोरोना'च्या प्रकोपाचं केंद्र असलेल्या वुहान शहराची सध्या काय आहे परिस्थिती?

'कोरोना'च्या प्रकोपाचं केंद्र असलेल्या वुहान शहराची सध्या काय आहे परिस्थिती?

वुहान शहराचा जो ग्राऊंड रिपोर्ट समोर आलाय तो चिंताजनक आहे. 1 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या महाकाय शहरात आज जणू स्मशान शांतता परसरलीय.

  • Share this:

चीन,07 फेब्रुवारी: चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरनं अक्षरश थैमान घातलंय. कोरोना व्हायसच सर्वाधिक प्रकोप झाला तो चीनमधल्या वुहान शहरात. याच शहरातून कोरोना जगभर पसरल्यानं चीनमधलं व्यापाराचं केंद्र असलेलं वुहान शहर आज कोरोनाचं केंद्र बनलंय. कोरोनानं या शहरात हाहाकार माजवला असून सगळ्या जगाच्या नजरा वुहानमधून येणाऱ्या बातम्यांकडे लागलेल्या आहेत. सगळ्यांना एकाच चिंतेनं ग्रासलंय. चीनच्या वुहान शहाराची आजची परिस्थिती काय आहे. कोरोनाच्या प्रकोपानंतर या शहराचं काय झालं असेल?

वुहान शहराचा जो ग्राऊंड रिपोर्ट समोर आलाय तो चिंताजनक आहे. कोरोना व्हायरसमुळे एकट्या चीनमध्ये आत्तापर्यंत 636 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. वुहान शहरातली परिस्थिती तर अत्यंत भयंकर आहे. शहरात जणू कोरोना कर्फ्यू लागू झाला आहे. 1 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या महाकाय शहरात आज जणू स्मशान शांतता परसरलीय. गुरुवारी कोरोना व्हायरसमुळे एका दिवसात तब्बल 73 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 636 वर पोहोचलीय. तर कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 31 हजारांवर पोहोचलीय. गुरुवारी एकट्या वुहान शहरातून व्हायरसची लागण झालेले नवे दीड हजार रुग्ण समोर आलेत. तर काही रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आलं आहे. वुहान शहराचे जे फोटो समोर आलेत ते चिंताजनक आहेत. सगळ्या शहरात सन्नाटा पसरलाय. रस्ते विराण पडलेत. जणू शहर कुलूपबंद झालं आहे. जिथं कुठं एखादा माणूस दिसतोय तो मास्क लावलेला आहे. चीन सरकारनं व्हायरस आणखी पसरू नये म्हणून काही कठोर प्रतिबंधात्मक निर्णय घेतलेत. त्यानुसार नागरिकांना घराबाहेर पडायला मज्जाव करण्यात आलाय. हॉटेलमध्ये जायला बंदी घालण्यात आली आहे. मोठ्या इमारतीच्या लिफ्ट बंद करण्यात आल्यात. अनेक इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतूकही बंद करण्यात आलीय. एखादा संक्रमीत व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या थोडाही संपर्कात आला की त्यालाही व्हायरची लागण होत आहे, म्हणून ही काळजी घेतली जातीय.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वुहान शहरात अगदी सात दिवसात हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा पराक्रमक स्थानिक प्रशासनानं केला. कठीण असं शिवधनुष्य यशस्वी पेललं. पण रुग्णांची संख्या इतकी झपाट्यानं वाढतीय की नवे हॉस्पिटलही अपुरे पडत आहेत. वुहान शहारात राहाणाऱ्या अनेक लोकांनी गेल्या काही दिवसात स्थलांतर करताहेत. अनेकजण जीव वाचवण्यासाठी याआधीच शहर सोडून निघून गेलेत.

First published: February 7, 2020, 8:56 PM IST

ताज्या बातम्या