चीनमध्ये 'कोरोना'चं थैमान; राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले, 'ही तर सर्वात मोठी हेल्थ एमर्जन्सी'

चीनमध्ये 'कोरोना'चं थैमान; राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले, 'ही तर सर्वात मोठी हेल्थ एमर्जन्सी'

कोरोनाव्हायरसबाबत (coronavirus) चीनचे राष्ट्राध्यक्ष (China President) शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी सर्वात मोठं विधान केलं आहे.

  • Share this:

बीजिंग 23 फेब्रुवारी : कोरोनाव्हायरस (coronavirus) चीनसाठी सर्वात मोठा धोका आहे. चीनमधून (China) पसरलेल्या कोरोनाव्हायरसने आतापर्यंत 78,000 पेक्षा जास्त लोकांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. फक्त चीनमध्येच या व्हायरसमुळे 2442 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता याबाबत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांचं सर्वात मोठं विधान आलं आहे.

AFP ने दिलेल्या वृत्तानुसार जिनपिंग यांनी कोरोनाव्हायरसला कम्युनिस्ट चीनच्या (Communist China) इतिहासातील ‘सर्वात मोठी हेल्थ एमर्जन्सी’ (Health emergency) म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाव्हायरसचं नाव कोविड-19 (COVID-19) असं ठेवलं आहे.

हेदेखील वाचा - 'कोरोना'चा हाहाकार; ऑलिम्पिक-आयफोनवर व्हायरसचं सावट, नोकऱ्याही धोक्यात

जगभरात कोरोनाव्हायरसचे 78,000 रुग्ण प्रत्येक देशाच्या आरोग्य विभागानं रविवारी कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची आकडेवारी जारी केली आहे.

देश                   रुग्ण              मृत्यू

चीन                 76,936         2,442

हाँगकाँग             69                 2

मकाऊ               10                 0

जपान                769                3

द.कोरिया          556                5

सिंगापूर             89                  0

इटली                79                  2

अमेरिका           35            चीनमध्ये एका अमेरिकन नागरिकाचा मृत्यू

थायलँड            35                  0

इराण               28                  6

तैवान               26                  1

ऑस्ट्रेलिया       23                  0

मलेशिया         22                  0

व्हिएतनाम       16                  0

जर्मनी              16                  0

फ्रान्स              12                  1

यूएई                11                  0

फिलिपिन्स       3                   1

भारत               3                   0

रुस आणि स्पेनमध्ये प्रत्येकी दोन तर त्याव्यतिरिक्त लेबनान, इज्रायल, बेल्जियम, नेपाळ, श्रीलंका, स्वीडन, कंबोडिया, फिनलँड आणि मिस्रमध्ये प्रत्येकी एक प्रकरण आहे.

चीननंतर दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

कोरोनाव्हारयसबाबत देशांनी जारी केलेली ही आकडेवारी पाहता चीननंतर जपान आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत आणि याचा परिणाम या देशांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. जपानच्या डायमंड प्रिन्सेस क्रुझवर कोरोनाव्हायरसचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. शिवाय कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता जपानमध्ये होणारं टोकियो ऑलिम्पिक 2020 देखील रद्द होण्याची शक्यता आहे. शिवाय दक्षिण कोरियात असलेलं जगातील सर्वात मोठं कार प्लांट हुंडाई बंद करण्यात आलं आहे.  द. कोरियामध्ये 25 हजार पेक्षा जास्त लोकांना सक्तीची रजा देण्यात आली आहे. यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत.

हेदेखील वाचा - ‘त्या’ जहाजावरील भारतीयांचा जीव धोक्यात, आणखी 4 जणांना झाला 'कोरोना'

 

First published: February 23, 2020, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading