Home /News /videsh /

चीनसोबत हा देशही चालवत होता वुहानमधील 'ती' लॅब, अमेरिकी संस्थांनी केली होती उपकरणांची तपासणी

चीनसोबत हा देशही चालवत होता वुहानमधील 'ती' लॅब, अमेरिकी संस्थांनी केली होती उपकरणांची तपासणी

उत्तर पश्चिम चीनमधील गांसू प्रांतातील लान्झोउमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. लान्झोउ वेटरीनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये डिसेंबरमध्ये या आजाराच्या अँटीबॉडीची सूचना चीन सरकारला दिली होती.

उत्तर पश्चिम चीनमधील गांसू प्रांतातील लान्झोउमध्ये लोकांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. लान्झोउ वेटरीनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये डिसेंबरमध्ये या आजाराच्या अँटीबॉडीची सूचना चीन सरकारला दिली होती.

अमेरिकेनं चीनच्या वुहान येथील लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप केल्यानंतर आता चीनही आक्रमक झाला आहे.

    बीजिंग, 08 मे : अमेरिकेचे (US) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) आणि विदेश मंत्री माइक पोम्पियो (Mike Pompeo) यांनी चीनच्या वुहान येथील लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप केल्यानंतर आता चीनही आक्रमक झाला आहे. चीनने सांगितले आहे की, वुहानमधील लॅब ही चीन आणि फ्रान्स मिळून चालवतात. तर, अमेरिकन संस्थांकडून येथील गोष्टींची तपासणी केली जाते. तर लॅबमध्ये काम करणाऱ्या लोकांना ट्रेनिंगही फ्रान्सकडून मिळते. दरम्यान, चीनवर केले जाणाऱ्या आरोपांच्या चौकशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रस्तावावर चीन अद्याप गप्प आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी वुहानच्या लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप खोटा असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चूनिंग यांनी सांगितले. तसेच, त्यांनी या लॅबचा फ्रान्सशी संबंध असल्याचे सांगून सर्वांना धक्का दिला. पॉम्पीओ यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हू चूनिंग यांनी, "पी4 वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (WIV) प्रयोगशाळा हा चीन-फ्रान्स सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे. आम्ही डिझाइन, बांधकाम आणि व्यवस्थापनात आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले आहे", असे सांगितले. वुहानमधील लॅब प्रशिक्षकांना फ्रान्स देत ट्रेनिंग चूनिंग यांनी असेही सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या पहिल्या गटाला फ्रान्सच्या एका प्रयोगशाळेत प्रशिक्षण दिले गेले होते. याव्यतिरिक्त, ते म्हणाले की अमेरिकन संस्थांसह मान्यताप्राप्त संस्थांकडून दरवर्षी लॅब उपकरणांची चाचणी केली जाते. चूनिंग यांनी पोम्पिओ यांना वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा उद्भव झाला हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे उपलब्ध 'ठोस पुरावे' सादर करण्यास सांगितले. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी असा दावा केला आहे की हा प्राणघातक विषाणू वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीपासून झाला आणि तिथूनच त्याची सुरुवात झाली. कोरोनावरून राजकारण चीनने दोन महिन्यांत या विषाणूवर मात केली आहे. अत्यंत विकसित देश असूनही अमेरिकेला अद्याप असे करण्यात यश आले नाही. डिसेंबरमध्ये मध्य चीनमधील वुहान येथे कोव्हिड-19 ची पहिली घटना झाल्यापासून आतापर्यंत 12 लाख अमेरिकन नागरिक संक्रमित झाले आहेत. तरस 73 हजारहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन मृत्यूमुखी पडले आहेत. अमेरिकेनं चीनवर आरोप केल्यानंतर जागितक आरोग्य संघटनेने वुहान लॅबची तपासणी करण्याची मागणी केली होती. चीनमधील राजदूत चेन शु यांनी डब्ल्यूएचओच्या तपासाला पाठिंबा दर्शवत असे म्हटले आहे की, “आम्ही असे कधीही म्हटले नाही की आम्ही डब्ल्यूएचओला विरोध करतो. आम्ही डब्ल्यूएचओच्या कार्यास पाठिंबा देत आहोत". दरम्यान एकीकडे संपूर्ण जग कोरोनाची दोन हात करत असताना चीन आणि अमेरिकेत मात्र या व्हायसरवरून रणकंदन माजले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या