मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोनापेक्षाही खतरनाक व्हायरस चीनमधून पसरण्याचा धोका, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

कोरोनापेक्षाही खतरनाक व्हायरस चीनमधून पसरण्याचा धोका, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

एका अग्रगण्य शास्त्रज्ञाने असा इशारा दिला आहे की, चीनमध्ये अशा वातावरणात काम केले जात आहे ज्यामुळे कोरोनापेक्षा धोकादायक व्हायरस पसरण्याचा धोका आहे.

एका अग्रगण्य शास्त्रज्ञाने असा इशारा दिला आहे की, चीनमध्ये अशा वातावरणात काम केले जात आहे ज्यामुळे कोरोनापेक्षा धोकादायक व्हायरस पसरण्याचा धोका आहे.

एका अग्रगण्य शास्त्रज्ञाने असा इशारा दिला आहे की, चीनमध्ये अशा वातावरणात काम केले जात आहे ज्यामुळे कोरोनापेक्षा धोकादायक व्हायरस पसरण्याचा धोका आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

बीजिंग, 20 जुलै : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनच्या वुहानपासून डिसेंबर 2019मध्ये कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. मात्र आता एका अग्रगण्य शास्त्रज्ञाने असा इशारा दिला आहे की, चीनमध्ये अशा वातावरणात काम केले जात आहे ज्यामुळे कोरोनापेक्षा धोकादायक व्हायरस पसरण्याचा धोका आहे. वर्ल्ड अॅनिमल प्रोटेक्शनमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ केट ब्लॅसजॅक यांनी सांगितले की, चीनमध्ये अतिशय आक्रमक पद्धतीने शेती केली जाते. ज्यामुळे अॅंटीबायोटिक रेजिस्टेंससोबतच कोरोनापेक्षाही एक भयंकर व्हायरस जन्म घेऊ शकतो.

Express.co.uk च्या रिपोर्टनुसार, सिंगापूरमध्ये राहणाऱ्या केट ब्लॅसजॅक यांनी सांगितले की, चीन बर्ड फ्लूच्या दोन नवीन व्हायरसशी लढत आहे. याशिवाय मानव, डुक्कर आणि एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरसने बनलेल्या स्वाइन फ्लूचीही प्रकरणे चीनमध्ये पाहायला मिळाली आहेत. हे सर्व विषाणू एकत्रितपणे धोकादायक व्हायरस स्ट्रेन निर्माण करू शकतात. केट ब्लॅसजॅक यांच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये सध्या असलेला स्वाइन फ्लू मानवाच्या घशावर आणि श्वसन प्रणालीवर वार करतो. केट म्हणाल्या की, गेल्या 15 वर्षात चीनमध्ये शेती करण्याच्या पद्धतींमध्ये वेगवान बदल झाला आहे. परंपरागत शेती सोडून आक्रमक शेती केली जात आहे ज्यात नियमांचे पालन केले जात नाही.

वाचा-किशोरवयीन मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होतोय जलद, शास्त्रज्ञांचा चिंताजनक दावा

एवढेच नाही तर, कमी जागी खूप प्राण्यांना एकत्र ठेवले जाते. ज्यामुळे त्यांनी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत व्हायरसचे नवीन उत्परिवर्तन होऊ शकते किंवा नवीन विषाणू उद्भवू शकतात. शेतातून सोडण्यात आलेला कचराही लोकांचा जीव धोक्यात आणू शकतो.

चीन जगातील सर्वात मोठे डुक्कराचे मांस उत्पादन करणारे देश आहे, तर जगातील कोंबडी उत्पादनात तो दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मुख्य म्हणजे चीनच्या वुहानमधील प्राण्यांचे मांस विकणाऱ्या बाजारपेठातून कोरोनाचा प्रसार झालेल्या दावे केले जात आहेत.

वाचा-पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार का? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रतिक्रिया

किशोरवयीन मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होतोय जलद

कोव्हिड-19चा (Covid-19) प्रसार किशोरवयीन मुलांमुळे जलद होत आहे. दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगात त्यांना हे आढळून आले. दक्षिण कोरियातमध्ये सध्या 5706 कोरोना रुग्ण हे 13 ते 19 वयोगटातील आहेत. शास्त्रज्ञांनी 60 हजार लोकांची चाचणी केली. यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की 11.8% रुग्ण हे घरातल्या लोकांमुळेच कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. मुख्य म्हणजे यातील 18.6% रुग्णांमध्ये कोरोनाचा प्रसार हा 10 ते 19 वयोगटातील मुलांमुळे झाला. या वयोगटातील मुलांमुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये केवळ 10 दिवसांत कोरोनाची लक्षणं दिसून आली. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मते 10 ते 19 या वयोगटामुळे सर्वात जास्त आणि जलद कोरोनाचा प्रसार होत आहे. 10 वर्षांच्या खालच्या वयोगटातील मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची संख्या कमी आहे.

वाचा-खासगी हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर शासकीय रुग्णालयात निगेटिव्ह!

First published:

Tags: Corona, Corona vaccine