फक्त 'या' एका व्यक्तीमध्ये आहे महाभयानक Coronavirus ला रोखण्याची ताकद

फक्त 'या' एका व्यक्तीमध्ये आहे महाभयानक Coronavirus ला रोखण्याची ताकद

अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या मते, फक्त स्वत:वर लक्ष ठेवलं तरी एकटी व्यक्ती कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमणाची साखळी तोडू शकते. 

  • Share this:

वॉशिंग्टन, 24 मार्च : कोरोनाव्हायरसला (Coronavirus) हरवण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे, मात्र फक्त एका व्यक्तीकडे या महाभयानक विषाणूला रोखण्याची ताकद आहे आणि ही व्यक्ती म्हणजे तुम्ही.

संसर्गजन्य आजारांच्या अभ्यास करणाऱ्या अमेरिकतल्या (America) 2 शास्त्रज्ञांच्या मते, एक सामान्य व्यक्तीही संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाचं योगदान देऊ शकतो. फक्त स्वत:वर लक्ष ठेवलं तरी एकटी व्यक्ती कोरोनाव्हायरस संक्रमणाची साखळी तोडू शकते.

हे वाचा - फक्त 20 सेकंद हात धुतल्याने जीवघेण्या Coronavirus चा नाश कसा होतो?

बिल हेनेज आणि हेलेन जेनकिन्स हे दाम्पत्य हावर्ड आणि बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च करत आहे. त्यांनी एक ट्री डायग्राम तयार केला आहे.

डॉ. बिल हेनेज सांगतात, जेव्हा संसर्गजन्य आजार तुमच्यापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा फक्त तो त्याला संक्रमित करत नाही तर तुमच्याप्रमाणेच त्यालाही इतर समस्यांना सामोरं जावं लागतं. कोरोनाव्हायरससारख्या गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला या आजाराची लागण होऊ न देणे आणि दुसरं म्हणजे तुमच्यामुळे इतरांना त्याची लागण होऊ नये. तुम्ही असं केलं तरच असा आजारांची साखळी तुटेल.

हे वाचा - तुम्हीही असू शकता कोरोनाव्हायरसचे Super spreader! विषाणू वेगाने पसरायचं भयंकर कारण आलं पुढे

डॉ. हेलेन जेनकिन्स म्हणतात, संसर्गजन्य आजारांना लोकं सुरुवातीला गंभीरतेने घेत नाही, मात्र जेव्हा त्यांना याचं गांभीर्य समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

दाम्पत्याच्या मते, लोकं स्वत:वर लक्ष देण्यापेक्षा इतर देशांमध्ये काय झालं आहे, त्यावर लक्ष देतात. लोकं फक्त बातम्या म्हणून पाहतात. जगभरात कोरोनाव्हायरस पसरतो आहे, अशा परिस्थितीत कोरोनाव्हायरसविरोधातील लढ्यात सरकारच्या भूमिकेपेक्षा वैयक्तिक भूमिका महत्त्वाची आहे. संसर्गजन्य आजारांच्या प्रसाराला रोखण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत.  लोकं स्वत:ला जितकं वेगळं ठेवतील तितका हा आजार पसरण्याची गती कमी होईल. जेव्हा वैयक्तिक यश सामूहिकतेमध्ये बदलेल, तेव्हा व्यापक स्तरावर या व्हायरसपासून बचाव होईल.

हे वाचा - Coronavirus चा संसर्ग हवेतून होऊ शकतो? WHO ने दिलं हे उत्तर

First published: March 24, 2020, 6:01 PM IST

ताज्या बातम्या