एका क्षणात 57 लोकांचा मृत्यू, समोर आला पाकिस्तानी विमान अपघाताचा LIVE VIDEO

एका क्षणात 57 लोकांचा मृत्यू, समोर आला पाकिस्तानी विमान अपघाताचा LIVE VIDEO

यामध्ये 57 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातून 3 प्रवासी बचावले आहेत.

  • Share this:

कराची, 23 मे : पाकिस्तानचं प्रवसी विमान शुक्रवारी कराचीजवळ कोसळून दुर्घटना घडली होती. प्रवाशांना लाहोरहून घेऊन निघालेलं विमान कराची विमानतळाजवळ येण्याआधी 1 किमी अंतरावर असताना कोसळलं होतं. विमान लँण्डिग करताना मागील भाग प्रथम इमारतीत कोसळला. त्यानंतर एका सेकंदापेक्षा कमी वेळानंतर तेथे एक स्फोट झाला आणि काळा धूर हवेत दिसला. ही संपूर्ण घटना त्याच भागात असलेल्या एका घराच्या छतावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

PK-8303 विमानातून 99 लोक प्रवास करत होते. कराचीजवळ शुक्रवारी दुपारी ही मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 57 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातून 3 प्रवासी बचावले आहेत.

पाकिस्तानने लॉकडाऊननंतर नुकतीच विमान सेवा सुरू केली होती. घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे जीव या अपघातात गेले आहेत.

पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या पाकिस्तान एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने आत्ताच जाहीर केलेल्या माहितीनुसार, PK8303 हे विमान कराचीकडे येत होतं. त्यामध्ये 99 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर होते. हे विमान अपघातग्रस्त झालं आहे.

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत गजबजलेल्या लोकवस्तीत विमान कोसळलं आहे. तिथे अँब्युलन्सची ये जा दिसते आहे. त्यामुळे या घटनेत मोठी हानी झाली असल्याची शक्यता आहे. अद्याप पाकिस्तानकडून अधिकृतपणे अपघातात झालेल्या नुकसानाबद्दल माहिती दिली गेलेली नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. PIA विमान अपघाताबद्दल कळलं तेव्हा धक्का बसला. आत्ता प्राधान्य लोकांना वाचवण्याच्या कामाला आहे. या घटनेची लवकरात लवकर चौकशी होईल, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 23, 2020, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading