मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, सरकारनं लॉकडाऊन लावताच नागरिक रस्त्यावर

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, सरकारनं लॉकडाऊन लावताच नागरिक रस्त्यावर

चीनमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढताच सरकारनं कडक लॉकडाऊनची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

चीनमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढताच सरकारनं कडक लॉकडाऊनची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

चीनमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढताच सरकारनं कडक लॉकडाऊनची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 नोव्हेंबर :  कोरोनाचा प्रभाव जगभरात कमी झाला आहे. त्यामुळे आता या जीवघेण्या आजारापासून सुटका मिळेल, असा दिलासा वाटत होता. पण पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं जगाची चिंता वाढलीय. रुग्णसंख्या कमी झाल्याने स्थानिक प्रशासनाने कोरोना निर्बंध शिथिल केले होते. पण आता पुन्हा संसर्ग वाढू लागल्याने ग्वांगझु शहरात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे संतापलेले लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सरकारच्या या निर्बंधांचा विरोध केला. या संदर्भात 'टीव्ही 9 हिंदी'ने वृत्त दिलंय.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये सोमवारी (14 नोव्हेंबर) रात्री उशिरा हायझु जिल्ह्यात लोक पोलिसांचं वाहन उलटवताना दिसत आहेत. ग्वांगझु येथील एका रहिवाशाने सांगितलं की, काल रात्री तिथं खूप तणावाचं वातावरण होतं.

सर्व लोकांनी घराचे दरवाजे बंद केले होते. आमच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडत होता. मंगळवारी चीनमध्ये 17,772 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. त्याच्या आदल्या दिवशी 16,072 रुग्ण सापडले. एप्रिलनंतर आढळलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. ग्वांगझुमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण हायझु भागात आहेत. सोमवारी ग्वांगझुमध्ये 5,000 हून अधिक प्रकरणांची नोंद केली गेली.

चीनमध्ये मोठे बदल; भारतावर कसे होणार परिणाम

हायझू जिल्ह्यात इतर प्रांतातील शेकडो स्थलांतरित मजूर कापड उद्योगात काम करतात. कडक लॉकडाउनमुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लॉकडाउन हटवण्याची मागणी केली जात आहे. ऑक्टोबरच्या शेवटी डझनभर निवासी क्षेत्रांमध्ये अधिकाऱ्यांनी निर्बंध लावले. तर, सोमवारी जिल्ह्याच्या जवळपास दोन तृतीयांश भागांतील लॉकडाउनचा कालावधी बुधवारी रात्रीपर्यंत वाढवण्यात आला होता.

चीनच्या सत्ताधारी पक्षाने मंगळवारी विविध ठिकाणी नियम शिथिल केले. त्यानंतर रुग्णसंख्या नियंत्रित करण्याच्या उद्देशाने लोकांना झिरो कोविड पॉलिसीचं पालन करण्याचं आवाहन केलं. कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'पीपल्स डेली'ने आपल्या संपादकीयामध्ये म्हटलं आहे की, 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या या चीनमधून कोरोना विषाणूचा पूर्णपणे नायनाट करण्याच्या प्रयत्नात सरकारने लॉकडाउनसारखं धोरण न डगमगता राबवावं. या प्रयत्नांचा भाग म्हणून चाचण्या वाढवल्या पाहिजेत, जेणेकरून लाखो लोकांना लॉकडाउनमध्ये ठेवता येईल.

हा तर अन्याय! अमेरिकेपेक्षा भारतीयांना Blue tick साठी मोजावे लागणार जास्त पैसे

लॉकडाउनमध्ये थोडीशी शिथिलता दिल्यानंतर गेल्या 24 तासांत 17,772 नवीन रुग्णसंख्या समोर आली आहे. बीजिंगच्या बाहेरील सर्वात मोठी प्रांतीय राजधानी शिजियाझुआंगमधील फ्री चाचणी केंद्रंदेखील एक दिवस बंद ठेवल्यानंतर पुन्हा उघडली गेली. बीजिंगमध्येही अलीकडच्या काही दिवसांत अनेक चाचणी केंद्रं बंद करण्यात आली होती, परंतु मंगळवारी त्यातील अनेक केंद्रं उघडण्यात आली.

First published:

Tags: China, Corona, Covid-19