कोरोनाव्हायरसचा उद्रेक! 2 आठवड्यांतच लाखो रुग्ण, धक्कादायक आकडेवारी समोर

कोरोनाव्हायरसचा उद्रेक! 2 आठवड्यांतच लाखो रुग्ण, धक्कादायक आकडेवारी समोर

2 आठवड्यांतच जगभरात कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) नवे एक लाख रुग्ण आढळून आलेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : डिसेंबर, 2019 मध्ये चीनच्या (China) वुहानमध्ये (Wuhan) कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) उद्रेक झाला. त्यानंतर शेकडोपेक्षा जास्त देशांमध्ये या व्हायरसने हातपाय पसरले. गेल्या 2 आठवड्यांतच जगभरात या महाभयंकर व्हायरसच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, 6 मार्चला जगभरात कोरोनाव्हायरसची 1,00,000 प्रकरणं होती. मात्र आता जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने (JHU) बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार हा आकडा 2,01,436 पोहोचला आहे. याचाच अर्थ 2 आठवड्यांतच तब्बल 1 लाख नवे रुग्ण आढळून आलेत.

हे वाचा - मुंबईत 22 वर्षीय तरुणीसह आणखी एका महिलेला कोरोनाची लागण, राज्यात आकडा 49वर

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 20 जानेवारीमध्ये चीन, थायलंड, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोनाव्हायरसची एकूण 282 प्रकरणं होती. चीनमध्ये जरी याचं प्रमाण जास्त असलं तरी इतर देशांमध्ये हा व्हायरस झपाट्याने पसरतो आहे.

!function(e,i,n,s){var t="InfogramEmbeds",d=e.getElementsByTagName("script")[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement("script");o.async=1,o.id=n,o.src="https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async");

जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हायरसला ग्लोबल पॅनेडिमिक म्हणून घोषित केलं, तर युरोपला या व्हायरसचा नवा केंद्र बिंदू असल्याचं म्हटलं.

जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल डॉ. टेड्रॉस अधनॉम घेब्रेसेस म्हणाले, "गेल्या 2 आठवड्यात चीनबाहेर व्हायरसची प्रकरणं तिप्पट वाढलीत.  पुढील काही दिवसांत आठवड्यात दिवसात कोरोनाव्हायरसचे रुग्ण, त्यामुळे होणारे मृत्यूंमध्येही वाढ होईल. शिवाय अधिकाधिक देशात हा व्हायरस पसरेल"

हे वाचा - इटलीहून आलेल्या दाम्पत्यासह 2 वर्षांच्या मुलीला झाला कोरोना, सरकारनं 1 किमीपर्यंत लावला कर्फ्यू

First published: March 19, 2020, 11:13 AM IST

ताज्या बातम्या