मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

CORONA VIRUS च्या भीतीने नागरिकांनी केला ब्रा, सॅनिटरी पॅड, संत्र्याच्या मास्कचा वापर PHOTO VIRAL

CORONA VIRUS च्या भीतीने नागरिकांनी केला ब्रा, सॅनिटरी पॅड, संत्र्याच्या मास्कचा वापर PHOTO VIRAL

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

वुहान, 31 जानेवारी : जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत चीनमध्ये 210हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा संसर्गजन्य आजार असल्यानं चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर मास्कची मागणी वाढली आहे. प्रत्येकालाच मास्क विकत घेणं शक्य नसल्यानं गरिब कुटुंबांना या वायरसपासून बचाव करण्यासाठी तिथल्या नागरिकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत.

ज्यांना मास्क घेणं शक्य नाही अथवा मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यानं पुरवठा अपुरा आहे अशा ठिकाणी तिथल्या नागरिकांनी युक्ती वापरून मास्क तयार केले आहेत. नागरिकांनी पॅडेड ब्रा, किंवा पॅडेड ब्रासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पंजचा वापर करून मास्क तयार केले आहेत. तर काही ठिकाणी मास्क म्हणून सॅनिटरी पॅडचा देखिल वापर केला जात आहे.

यासोबतच संत्र्यांची गोल साल कापून त्याचा मास्क सारखा वापर करण्यात आला आहे. ज्यांच्यापर्यंत मास्क पोहोचू शकत नाहीत किंवा जे मास्क विकत घेऊ शकत नाहीत अशा नागरिकांना कोरोना वायरसपासून आपला बचाव करण्यासाठी अशा प्रकारचे मास्क तयार केले आहेत.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारताने केली तयारी

भारतातील केरळमध्ये कोराणा विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दिल्लीमध्ये काही संशयास्पद रुग्णही सापडले आहेत. देशातील जवळपास 21 विमानतळांवर चीन आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या प्रवाशांची औष्णिक तपासणी केली जात आहे. भारतीय विमानतळांवर सुमारे 100 स्कॅनर बसविण्यात आले आहेत. यासह चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची तयारीही सुरू केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना शुक्रवारी बाहेर काढण्यात येईल. तेथून निघण्यास राजी झालेल्या भारतीयांना आणण्यासाठी एअर इंडियाचे विमान शुक्रवारी वुहान शहरात पोहचेल. यानंतर हुबेई प्रांतात अडकलेल्या उर्वरित भारतीयांना दुसर्‍या विमानातून बाहेर काढण्यात येईल. परराष्ट्र मंत्रालयाच्या यादीमध्ये सुमारे 374 विद्यार्थी पहिल्या विमानातून भारतात परत येणार आहेत. तेथून बाहेर काढण्यापूर्वी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही केली जाईल. त्या विद्यार्थ्यांना परराष्ट्र मंत्रालयाने मास्क, ग्लोव्हज, टिशू पेपर आणि हँड सॅनिटायझर, अन्न व पाण्याच्या बाटल्या यासारख्या वस्तू आपल्यासोबत नेण्याचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांना छोट्या सूचनेवर तिथून निघण्यास तयार राहण्यास सांगितले आहे.

हेही वाचा-कोरोनाव्हायरसचा भारताने घेतला धसका; चीनमधील भारतीयांना उद्याच Airlift करणार

चीनच्या वैज्ञानिकांनी वर्षभरापूर्वी दिला होता इशारा

वटवाघळापासून पसरणाऱ्या व्हायरसबद्दल चीनमध्ये सातत्यानं संशोधन सुरु आहे. याच शास्त्रज्ञांनी वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता की वटवागळापासून कोरोला व्हायरसची लागण होवू शकते.महत्वाची बाब म्हणजे वुहानमधील शास्त्रज्ञांनीच हा इशारा दिला होता. कोरोना व्हायरस पसरला तर तो प्रचंड धुमाकूळ घालू शकतो. अनेकांचे जीव घेवू शकतो. चीनचं वातावरण कोरोना व्हायरससाठी अत्यंत अनुकूल असून त्यामुळे साथीसारखी परिस्थिती उद्भवू शकते इतका स्पष्ट संकेत देण्यात आला होता. पण व्हायरस कधी, कुठून येईल याचा मात्र कुणालाचा अंदाज नव्हता.

हेही वाचा-धोकादायक कोरोना VIRUSचा खेडमधील मुलींना फटका, भुकेने होत आहेत हाल

First published:

Tags: China, China news, Coronavirus, India-China