ब्रुसेल्स, 27 डिसेंबर : ख्रिसमस आणि न्यू इयर साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या उत्साहात मात्र कोरोनाकडे कानाडोळा करणं महागात पडलं आहे. गिफ्ट देणारा आणि आनंद घेऊन येणाऱ्या सांताक्लॉजकडून ख्रिसमसचं गिफ्ट घेणं केअर होममधील वृद्ध आणि कर्मचाऱ्यांना महागात पडलं आहे.
बेल्जियमच्या मोल येथील हेमलेरिजेक केअर होममध्ये 25 डिसेंबरला सांताक्लॉज बनून एक व्यक्ती आला. त्याने वृद्धांना छान गिफ्ट दिलं आणि बराच वेळ त्यांच्यासोबत देखील घालवला. या साताक्लॉजमुळे तिथल्या कर्मचाऱ्यांसह वृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे. होम केअरमधील 121 जणांना कोरोनाची लागण झाली असून 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 121 जणांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
हे वाचा-Coronavirus पेक्षा गंभीर समस्यांना तयार राहा, WHO च्या प्रमुखांचा इशारा!
मिळालेल्या माहितीनुसार 121 जण आणि 36 केअर होमचे कर्मचारी या सांताक्लॉजमुळे कोरोना संक्रमित झाले आहेत. ही घटना बेल्जियम इथे ख्रिसमसच्या दिवशी घडल्यानं खळबळ उडाली आहे. एका कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार जो व्यक्ती सांताक्लॉज बनून आला होता तो एक तज्ज्ञ डॉक्टर आहे. तो इथल्या वृद्धांची इतरवेळी मदत देखील करतो. बेल्जियम या शहराची लोकसंख्याच 35 हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे इथे प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
तर अनेक वैज्ञानिक आणि तिथल्या काही तज्ज्ञांच्या मते सांताक्लॉजमुळे हा कोरोना पसरला नाही असा दावा देखील करण्यात आला आहे. याप्रकरणाला आता सोशल मीडियावर एक वादाची किनार देखील मिळाली आहे. सांताक्लॉज येऊन गेल्यानंतर सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा केअर होमकडून करण्यात आला आहे.