Home /News /videsh /

कोरोनाव्हायरसचा प्रकोप 10 दिवसांत वाढणार, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता... Alert राहा, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

कोरोनाव्हायरसचा प्रकोप 10 दिवसांत वाढणार, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता... Alert राहा, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

चीनमध्ये कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. काही तासांमध्येच तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृत्यूचा आकडा 132 वर पोहोचला आहे.

    बीजिंग, 29 जानेवारी : चीनमधील कोरोनाव्हायरसच्या मृतांचा आकडा 132 वर पोहोचला आहे. एकाच दिवसांत या व्हायरसने तब्बल 25 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे पुढील 10 दिवसांत व्हायरसचा प्रकोप वाढेल, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनमध्ये जवळपास 6000 लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरसची लागण झालेली 5,974 प्रकरणं समोर आलीत, तर व्हायरसमुळे होणाऱ्या न्यूमोनियाची 31 नवीन प्रकरणं समोर आलीत. चीनमधील सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 1,239 जणांची प्रकृती गंभीर आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न चीनमधल्या वुहान शहरात सर्वात जास्त रुग्ण असून तिथेच हा व्हायरस सापडला होता. त्यामुळे चीन सरकारने हे शहर सार्वजनिक वाहतुकीपासून बंद केलं आहे. शहराचे सर्व रस्ते येण्या-जाण्यासाठी बंद केले असून नागरिकांना या शहरात जाण्यापासून आणि शहरात प्रवेश करण्यापासून नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. या शहरात 250 ते 300 भारतीय असून त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. या भारतीयांच्या सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची परवानगी केंद्र सरकारने चीनकडे मागितली आहे आणि त्याची पूर्ण तयारी केंद्र सरकारने केली आहे. चीन सरकारची परवानगी मिळताच, या भारतीयांची सुटका केली जाईल आणि 14 दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीत ठेवलं जाईल.दरम्यान भारतातील महत्त्वाच्या 21 विमानतळांवर चीनहून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते आहे. यामध्ये दिल्ली, हैदराबाद, मुंबई कोचिन, बंगळुरू, अहमदाबाद, अमृतसर, कोलकाता, कोइंबतूर, गुवाहाटी, गया, जयपरू, लखनऊ, चेन्नई, त्रिवेंद्रम, त्रिची, वाराणसी, भुवनेश्वर, गोवा या विमानतळांचा समावेश आहे. हेदेखील वाचा - महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या 8, नागरिकांनो Alert राहा कोरोनाव्हायरसची लक्षणं सर्दी ताप खोकला घसा खवखवणे श्वास घेताना त्रास डोकेदुखी कोरनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय कराल? हात स्वच्छ धुवा शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका प्राण्यांपासून दूर राहा हेदेखील वाचा - Google वर 'कोरोना' सर्चिंग... व्हायरससह बिअरही ट्रेंडिंग
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Health, Virus

    पुढील बातम्या