मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

COVID-19 : मृत्यूआधी पत्नीसाठी लिहिलं असेल पहिल्यांदाच असं पत्र; वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

COVID-19 : मृत्यूआधी पत्नीसाठी लिहिलं असेल पहिल्यांदाच असं पत्र; वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

32 वर्षीय तरुणानं आपल्या पत्नी आणि दोन मुलांसाठी खास चिठ्ठी लिहिली होती.

32 वर्षीय तरुणानं आपल्या पत्नी आणि दोन मुलांसाठी खास चिठ्ठी लिहिली होती.

32 वर्षीय तरुणानं आपल्या पत्नी आणि दोन मुलांसाठी खास चिठ्ठी लिहिली होती.

    वॉशिंग्टन, 26 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसनं मृत्यू होण्याआधी 32 वर्षीय तरुणानं आपल्या पत्नी आणि दोन मुलांसाठी खास चिठ्ठी लिहिली होती. ही चिठ्ठी इतकी भावुक होती की त्यामुळे पत्नीलाही ती वाचताना अश्रू अनावर झाले नाहीत. 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं सामान तपासून घेऊन जात असताना पत्नीला त्यामध्ये मोबाईल दिसला. तिने उघडून पाहिला तर त्यामध्ये तरुणानं नोटपॅडमध्ये पत्नी आणि मुलांसाठी एक पत्र लिहिलं होतं. अमेरिकेतील कनेटिकटमधील डॅनबरी इथली घटना आहे. महिनाभर या तरुणावर कोरोनाचे उपचार सुरू होते. 20 दिवसांपासून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आणि अचानक 22 एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. कोरोनासोबत त्याची झुंज अपयशी ठरल्यानं पत्नीसह दोन मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या तरुण तिथल्या स्थानिक न्यायालयात काम करत होता. त्याला अचानक कोरोनाचा संसर्ग झाला आणि रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करावं लागलं होतं. पत्नीनं दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. मात्र नंतर पत्नी आणि मुलांमध्येही कोरोनाची लक्षणं दिसू लागली. पत्नीला आपल्या पतीला भेटण्याची फार इच्छा झाली होती. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हे वाचा-लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी 3 लाख रु. केले खर्च, गावी पोलिसांना सांगितली हकीकत 'मी तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो. तू मला उत्तम आयुष्य दिलेस मी खूप भाग्यवान आहे आणि मला अभिमान आहे की मी तुमचा पती आहे आणि ब्रेडिन-पेनीचा पिता आहे. केटी, मी ज्यांना भेटलो त्या सर्वांमध्ये तू सर्वात सुंदर आणि काळजी घेणारी व्यक्ती आहेस. 'तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने जगायला हवे. आपल्याला मुलांसाठी सर्वोत्कृष्ट आई म्हणून पाहण्याचा एक चांगला अनुभव होता. तुला जर कोणी चांगलं तुमच्यावर प्रेम करणारं मिळालं तर स्वत:ला अडवू नको. तुम्ही कायम आनंदी राहा.' तरुणानं हे आपल्या पत्नी आणि मुलांना लिहिलं पत्र वाचून पत्नी खूप भावुक झाली. तिलाही अश्रू अनावर झाले. शेवटचं पतीला भेटता आलं नाही याचं दु:ख सोबत होतच पण त्याही पेक्षा जास्त हक्काचा पती मगवल्याचं दु:ख जास्त होतं. कोरोना व्हायरसमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जगभरात या व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. हे वाचा-कोरोनामुळे शहीद झालेल्या 2 पोलीस कॉन्स्टेबलना बिंग बींगकडून श्रद्धांजली संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या