लवकरच कोरोनाला सारं जग हरवणार, 'या' देशात सुरू आहे लसीची चाचणी

लवकरच कोरोनाला सारं जग हरवणार, 'या' देशात सुरू आहे लसीची चाचणी

कोरोना विषाणूसारख्या आपत्तीविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सध्या अमेरिकेत या लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 17 मार्च : चीनमधून आलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत 7 हजार 158 लोकांचा जीव घेतला आहे. तर 1.80 लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. परिस्थितीची तीव्रता पाहता डब्ल्यूएचओने कोरोनाला महामारी (साथीचा रोग) जाहीर केला आहे. अमेरिकेतही कोरोना विषाणूमुळे 60 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

या सगळ्यात एक आनंदाची बातमी येत आहे. ती म्हणजे अमेरिकेत सध्या कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लसीची चाचणी सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती देत, लवकरच कोरोनावर मात करणार असल्याचे सांगितले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, "या लसीच्या पहिल्या टप्प्यात चाचणी सुरू झाल्याने मला आनंद झाला आहे. ही इतिहासातील सर्वात छोटी लस आहे. आम्ही अँटी व्हायरल थेरपी आणि इतर पद्धतींवरही काम करत आहोत. त्यामुळे लवकरच चांगली बातमी मिळेल", असे ट्वीट केले आहे.

वाचा-कोरोनाचा कहर! मृतांची संख्या वाढली, आतापर्यंत 7 हजार लोकांचा घेतला जीव

वाचा-कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी होम क्वारंटाइन; जाणून घ्या काय करावं, काय नाही

या प्रयोगाचा अभ्यास करणारे डॉ. जॅक्सन यांनी, कोरोना विषाणूसारख्या आपत्तीविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या चाचणीसाठी 45 जणांची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले. या सर्व लोकांना वेगवेगळ्या प्रमाणात लस दिली जाईल. या लसीचा दुष्परिणाम होत नाही हे सध्या पाहिले जात आहे.

वाचा-पाकिस्तानमध्ये कोरोनाचं थैमान, 24 तासांमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्ण आढळले

ही लस कोरोनाला हरवणार

कोरोना विषाणूमुळे जगातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, परंतु काही लोक आहेत जे जगभरातील लोकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या लसीच्या चाचणीत सामील झालेल्या 43 वर्षीय महिला जेनिफर हेलर यांनी, "आम्ही सर्व जण असहाय्य आहोत. अशा परिस्थितीत, जर आपण काही उपयोगात आणत असाल तर ते आपले चांगले भविष्य आहे", असे सांगितले. या लसीला MRNA -1273 असे कोड नाव देण्यात आले आहे.

वाचा-मंत्री, खेळाडू, कलाकारांनाही ‘कोरोना’; ‘या’ नामांकित व्यक्तींना व्हायरसची लागण

लस चाचणीसाठी 18 ते 55 वर्षीय लोकांची निवड

या संशोधनात करण्यात आली आहे. या सर्व लोकांना लस दिल्यानंतर त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. त्यातून त्याचे कोणतेही दुष्परिणाम आहेत का ते शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक, ही लस रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तयार केली गेली आहे.

First published: March 17, 2020, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading