Home /News /videsh /

'या' देशात सापडला Corona चा नवा व्हेरिएंट, जाणून घ्या किती Dangerous?

'या' देशात सापडला Corona चा नवा व्हेरिएंट, जाणून घ्या किती Dangerous?

फोटो सौजन्य - PTI

फोटो सौजन्य - PTI

कोरोना व्हायरससंदर्भातली (Corona Virus) मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलमध्ये (Israel) कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट (New variant) सापडला आहे.

    जेरुसलम, 17 मार्च: कोरोना व्हायरससंदर्भातली (Corona Virus) मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलमध्ये (Israel) कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट (New variant) सापडला आहे. आतापर्यंत दोन जणांना या प्रकाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलमध्ये नवीन कोरोना व्हेरिएंटची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. देशाच्या आरोग्य (Ministry of Health) मंत्रालयानुसार, पीसीआर टेस्ट दरम्यान कोविडच्या नवीन प्रकाराची माहिती मिळाली आहे. बेन गुरियन विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांची पीसीआर चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की सध्याच्या स्ट्रेनमध्ये ओमायक्रॉन प्रकारातील BA.1 आणि BA.2 या दोन सब व्हेरिएंटची उपस्थिती आढळून आली आहे. ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 व्हेरिएंटनी संक्रमित इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे की, कोविडचे हे व्हेरिएंट स्वतःमध्ये अद्वितीय आहे. असे एकही प्रकरण आतापर्यंत समोर आलेले नाही. तसंच ते म्हणाले की, BA.1 आणि BA.2 ची संयुक्तपणे लागण झालेल्या प्रवाशांना सौम्य ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखण्याचा त्रास होत आहे. याशिवाय त्यांच्यामध्ये अजून कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. यामुळे त्यांना कोणत्याही विशेष वैद्यकीय प्रतिसादाची आवश्यकता नाही. संसर्गाची नवीन प्रकरणं ही चिंतेची बाब नाही इस्रायलचे महामारी प्रतिसाद प्रमुख सलमान जरका म्हणाले की,संसर्गाच्या नवीन प्रकरणांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. एकत्रित प्रकाराबाबतची परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे. आम्हाला आता याची काळजी करण्याची गरज नाही. चीनमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ चीनमध्ये कोरोनाच्या या सब व्हेरिएंट BA.2 प्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. संसर्गाची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत येथे कोरोना व्हायरसचे पाच हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सब-व्हेरिएंट 'Stealth'चा सर्वाधिक लोकांना त्रास होत असल्याचे आढळून आलं आहे. जगात कोविडची चौथी लाट पाहता जागतिक आरोग्य संघटनेनंही इशारा दिला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona updates, Coronavirus, Israel

    पुढील बातम्या