कोरोना व्हायरस: जीव धोक्यात घालून रुग्णांची मदत करतेय गरोदर नर्स, Video Viral

कोरोना व्हायरस: जीव धोक्यात घालून रुग्णांची मदत करतेय गरोदर नर्स, Video Viral

चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर एक 9 महिन्यांची गरोदर नर्स उपचार करत आहेत. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

वुहान,23 फेब्रुवारी - चीनमध्ये कोरोना (Coronavirus) व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे प्रचंड गदारोळ उडाला आहे. तर दुसरीकडे प्रत्येक दिवशी शेकडो लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू होतो आहे. यासगळ्यामध्ये एका व्हिडिओमुळे एका मोठा वाद निर्माण झाला आहे. सरकारी चॅनेल सीसीटीव्हीकडून प्रसारित केलेल्या या व्हिडिओत एक 9 महिन्यांची गरोदर नर्स दाखवण्यात आली आहे ती कोरोने पीडित रुग्णांची सेवा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर जगभरातील लोकांनी चीनवर जोरदार टीका केलीय.

या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

CCTV ने या व्हिडीओला मागील आठवड्यात प्रसारित केलं होतं. या व्हिडीओत जहों यू नावाची एक नर्स वुहानच्या सैनिक रुग्णालयातील अतिदक्षता वॉर्डमध्ये दिसते आहे. 9 महिन्यांची गरोदर असलेली ही नर्स रुग्णांची तपासमी करताना दिसतेय. यातीलच एक रुग्ण या नर्सला इथे काम करू नका असं सांगत होता कारण इथं काम करमं धोक्याचं असल्याचं एक रुग्ण या नर्सला सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये ऐकायला येतं आहं. तर त्याला नर्स म्हणाली की तिच्या गरोदरपणामुळे तिच्या कुटुबियांनाही तिने काम करू नये आसं वाटतं आहे. मात्र आपल्याला रुग्णांना मदत करायची असल्याचं तिने सांगितलं.

चीनवर टीका

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर लोकांनी चीनवर मोठ्या प्रमाणावर टीका करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की चीनला अशा प्रकारे व्हिडीओ बनवण्याची गरज नव्हती. कसं कुणी 9 महिन्यांच्या गरोदर नर्सकडून काम करून घेऊ शकतो? असा प्रश्न आता लोक उपस्थित करायला लागले आहे.

<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/Lzk7-Kw-K4w" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

आहे. ज्यामध्ये एका नर्सचं मुंडन करताना पाहायला मिळतं आहे. आणि ती रडते आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, मुंडन केल्याने रुग्णांची सेवा करणं सोपं जाईल. खरंतर नर्सचं मुंडन केल्यानंतर बचावासाठी असणारे स्पेशल कपडे आणि किट ती आरामात परिधान करू शकते. मात्र जगभरातील लोक आता या व्हिडीओवर सुद्धा प्रश्न उपस्थित करत आहेत. नर्सचं मुंडन करण्याऐवजी त्यांचे केस छोटे कापले असते तर काय फरक पडला असता का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.

हेही वाचा..

भारत दौऱ्यामध्ये सोन्या-चांदीच्या ताटात जेवणार डोनाल्ड ट्रम्प

कोंबड्यांची झुंजीत मालकाचा मृत्यू, असं प्रकरण ज्यात आरोपीला नाही पकडू शकले पोलीस

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 03:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading