भयंकर! संसर्ग वाढवण्यासाठी या देशात आयोजित केली जातेय ‘कोरोना व्हायरस पार्टी’

भयंकर! संसर्ग वाढवण्यासाठी या देशात आयोजित केली जातेय ‘कोरोना व्हायरस पार्टी’

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. आतापर्यंत कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 7 मे : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण आहे. जगभरात कोरोनामुळे (Covid -19) मृत्यूची संख्या लाखोंमध्ये पोहोचली आहे. यादरम्यान कोरोना व्हायरससंदर्भात काही हैराण करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अमेरिकेतील (America) काही शहरांमध्ये लोक जाणून-बुजून संक्रमित होण्यासाठी कोरोना व्हायरस पार्टी करीत आहेत. अशा पार्टींमध्ये लोक मोठ्या संख्येने संक्रमित होत आहेत. अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या येथे कोरोनाबाधितांची संख्या लाखांपर्यंत पोहोचली आहे.

डेली मेलच्या बातमीनुसार वॉशिंग्टनच्या उत्तर पश्चिम भागात अशा प्रकारे कोरोना व्हायरस पार्टी करीत असल्याची माहिती मिळाली आहे. जाणून-बुजून कोरोना व्हायरसचा फैलाव करण्यासाठी अशा प्रकारच्या पार्टीचे आयोजन केल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

या जीवघेण्या व्हायरसमध्ये अशा स्वरुपाची गर्दी जमा करणे धोक्याचे आहे. लोक अशी पार्टी करून स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत, अशी माहिती तेथील एका अधिकाऱ्याने दिली. या व्हायरसच्या उपचाराबाबत अद्याप नेमकी माहिती नाही. संक्रमण झाल्यानंतर हा आजार किती दिवस राहिल याबाबतही साशंकता आहे, असे तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमेरिकेतील सिएटलच्या दक्षिण पूर्व भागात काही लोकांनी जाणून-बुजून कोरोना पार्टी आयोजित केली. या पार्टीचा उद्देश हा आजारी नसलेल्या लोकांना संक्रमित करण्याचा आहे.  सांगितले जात आहे की, या पार्टीमुळे 100 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही सर्व स्वइच्छेने संसर्गित झालेली आहेत.

संबंधित -भारतीय वंशाच्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी UK च्या पंतप्रधानांचा कोटींचा करार

आत्महत्येनंतर महिलेचा ऑडिओ झाला व्हायरल; म्हणाली, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे...

First published: May 7, 2020, 10:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading