जपानमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लोकांना वाटले 2 हजार iPhone

जपानमध्ये कोरोनाची लागण झालेल्या लोकांना वाटले 2 हजार iPhone

जपानच्या सरकारने डायमंड प्रिन्सेस क्रूझवर अडकलेल्या कोरोनाग्रस्त प्रवाशांना 2 हजार आयफोन वाटले आहेत.

  • Share this:

टोकियो, 17 फेब्रुवारी : चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाची भीती जगातील अनेक देशांना आहे. चीनमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करून देशात घेतलं जात आहे. यात आता जपानच्या सरकारने डायमंड प्रिन्सेस क्रूझवर अडकलेल्या कोरोनाग्रस्त प्रवाशांना 2 हजार आयफोन वाटले आहेत. या सर्व आयफोनमध्ये सोशल मीडिया अॅप लाइन इन्स्टॉल केलं आहे. यावरून लोकांना मेसेज करून कोरोनापासून वाचण्यासाठी सल्ला देता येईल.

मॅकोटकाराच्या एका रिपोर्टनुसार, जपानच्या सरकारने प्रवासी आणि क्रूझवरील कर्मचाऱ्यांना 2 हजार आयफोन दिले आहेत. यात आधीच लाइन अॅप इन्स्टॉल केलं आहे. याच्या मदतीने प्रवाशांना जपानमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करता येणार आहे. जहाजावरील कर्मचारी आणि प्रवासी यांच्यासाठी प्रत्येक केबिनमध्ये कमीत कमी एक आयफोन दिला आहे.

जपानच्या बाहेर रजिस्टर्ड गूगल प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवर लाइन अप डाउनलोड करण्याचा पर्याय नाही. यापूर्वी क्रूझवरील अनेक सदस्यांनी सांगितलं होतं की, लाइन अॅप आयफोनमध्ये सहज वापरता येतं मात्र अँड्रॉइडमध्ये त्यात अडचणी येतात. त्यामुळे आयफोन वाटण्यात आले आहेत.

Coronavirus : दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढताच, आतापर्यंत 1700 जणांचा मृत्यू

डायमंड प्रिन्सेस क्रूझवर जवळपास 3 हजार 700 प्रवासी आहेत. यात सहा भारतीयांचा समावेश आहे. जहाजावर 1100 क्रू मेंबर असून त्यात 132 भारतीय आहेत. यातील 350 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोणत्याही भारतीयला कोरोना झालेला नसल्याची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. जपान यासाठी योग्य ती पावले उचलत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वाचा : अखेर चीनला Coronavirus वर इलाज मिळाला, काय आहे सत्य?

First published: February 17, 2020, 5:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या