चीनमधील कोरोना व्हायरसमुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता

चीनमधील कोरोना व्हायरसमुळे भारतात महागाई वाढण्याची शक्यता

खाण्या-पिण्याच्या पदार्थांच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : चीनमध्ये पसरणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा परिणाम जगभरातील व्यापार व्यवस्थेवरही (China Coronavirus Impact on Indian Economy) होत आहे. जेथे कच्चे तेल स्वस्त झाल्याने घरगुती बाजारमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होत आहेत. तर दुसरीकडे दैंनदिन जीवनातील अनेक गोष्टी आता महाग होण्याच्या मार्गावर आहेत. इंग्रजीतील बिझनेस वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्समध्ये आलेल्य़ा वृत्तानुसार, भारत चीनकडून खाण्या-पिण्याच्या वस्तूंची खरेदी करतो. यामध्ये राजमा प्रमुख आहे. देशात प्रत्येक वर्षी 50 टक्के राजमा चीनमधून आयात केला जातो. विशेषज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, भारतीय कंपन्या औषधं तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा मालदेखील चीन खरेदी करतो. अशा परिस्थिती पुरवठा थांबवल्याचा परिणाम औषधांच्या किंमतींमध्ये होऊ शकतो.

भारतात महाग होऊ शकतात या गोष्टी

खाण्या-पिण्याच्या पदार्थांवर होणार परिणाम – वृत्तपत्रातील बातमीनुसार, चीनमध्ये डलियन बंदरावर शिपमेंट नसल्याने जगभरात राजमाच्या किंमती 8 टक्क्यांहून जास्त वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या किंमती 1100 डॉलर क्विंटल झाल्या आहेत. तर चीनमध्ये अजूनही व्यापारांची रेलचेल थांबली आहे. अहवालानुसार भारतात पोहोचणाऱ्या 300 कंटेनर बंदरात अडकले आहेत.

औषधं होऊ शकतात महाग

वीएम पोर्टफोलियाच्या रिसर्च हेड विवेक मित्तलने दिलेल्या बातमीनुसार औषधं तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्च्या मालाचा पुरवठा चीनमधून केला जातो. अशा परिस्थितीत कंपन्यांना दुसऱ्या देशातील कंपन्यांकड़ून जास्त किंमतीत माल खरेदी करावा लागण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह आणि रक्तदाबाच्या औषधांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

एसी-फ्रिज आणि टिव्हीही होऊ शकतो महाग

त्यांचे म्हणणे आहे की, कंज्युमर ड्युरेबल कंपन्यादेखील किंमती वाढवू शकतात. कारण एसी, फ्रिजचे पार्ट्स चीनमधून आयात केले जातात. चीनमधील वुहान शहर हे ऑटो हबही आहे.

अन्य बातम्या

शाळांमधून सावरकरांचे फोटो काढा, कॉंग्रेस सरकारचा आदेश

भाजप सरकारकडून मदरसे आणि संस्कृत शाळांवर बंदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 02:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading