मुंबई, 07 मार्च : कोरोना व्हायरसच्या विळख्यात जगभरातील 80 देश आले आहेत. त्याची भीती आता भारतालाही सतावत आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं जगभरात वाढताना दिसत आहे. याचा फटका आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेपासून ते मोठ्या कंपन्यांनाही फटका बसला आहे. सोशल मीडियातील सर्वात मोठी आणि नावाजलेली कंपनी फेसबुकचाही त्यात समावेश आहे. शुक्रवारी फेसबुक कंपनीतील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा संसर्ग पसरू नये म्हणून फेसबुक कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. याआधी कंपनीने सिंघापूर इथल्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती. आता लंडनच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
या कार्यालयाची सफाई कऱण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
13 मार्चपर्यंत या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. शांघायमधील फेसबुक कार्यालय कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. आता कोरोनानं फेसबुकच्या कार्यालयातही प्रवेश केल्यानं त्याचा फटका बसला आहे. याआधी कोरोनाच्या भीतीमुळे दिल्लीतील एका खासगी शाळेला 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.
हे वाचा-कोरोना व्हायरसचं वाढतं संकट, सर्दी-खोकला ताप आल्यास असा ओळखा कोरोना
भारतात संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 31वर पोहचली आहे. यातील तीन रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत. दुसरीकडे देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे दिल्लीत शाळेला सुट्टी देण्यात आली आहे.
हे वाचा-आता 'कोरोना'च माणसांना घाबरणार; हे कवच घातल्यावर व्हायरस जवळही येणार नाही