कोरोनामुळे इम्रान खान यांच्या खुर्चीला धोका, पाकिस्तानात सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी

कोरोनामुळे इम्रान खान यांच्या खुर्चीला धोका, पाकिस्तानात सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी

सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं म्हटलं जात आहे. हा वाद वाढत गेला तर लष्कर सत्ता हातात घेऊ शकते अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 26 एप्रिल: अपुरी साधन सामुग्री, नियोजनाचा अभाव, तळाला गेलेली अर्थव्यवस्था अशा स्थितीत पाकिस्तान कोरोनाविरुद्ध लढत आहे. अशी गंभीर परिस्थिती असतानाच पाकिस्तानी लष्कराने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या घोषणेच्या विरुद्ध जात लष्कराने देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. लष्कर आक्रमक झाल्यामुळे इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आली असं मतही व्यक्त केलं जात आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करू नये अशी भूमिका इम्रान खान यांनी घेतली होती. त्याबाबत त्यांनी घोषणाही केली होती. लॉकडाऊन केलं तर गरिबांचे हाल होतील. त्यांना अन्न मिळणार नाही असं त्यांचं मत होतं. मात्र याला छेद देत लष्कराच्या प्रवक्त्याने लॉकडाऊनची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी लष्कर करणार असल्याचं सांगितलं.

आतंरराज्य परिषदेच्या माध्यमातून लष्कर प्रशासनामध्ये समन्वयाचं काम करत आहे. त्यामुळे सरकार आणि लष्करामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं म्हटलं जात आहे. हा वाद वाढत गेला तर लष्कर सत्ता हातात घेऊ शकते अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

जगातली सर्वात मोठी बातमी: किम जोंग उन गेला कोमात, आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानी लष्कराने शांत राहण्याची भूमिका घेत निवडणुका पार पाडल्या होत्या. त्यानंतर इम्रान खान हे पंतप्रधान झाले होते. खान हे लष्कराच्या हातचे बाहुले आहेत असा आरोपही सातत्याने केला जातो. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये कोरोनाने विक्राळ स्वरुप धारण केलं आहे.

हे वाचा...

एका दिवसात 1258 लोकांचा मृत्यू, तरी अमेरिकेसाठी का आहे ही दिलासादायक बातमी?

चपलांमार्फत पसरू शकतो कोरोनाव्हायरस, संशोधनात धक्कादायक बाब समोर

 

 

 

First published: April 26, 2020, 3:46 PM IST
Tags: imran khan

ताज्या बातम्या