Home /News /videsh /

धक्कादायक! इटलीमध्ये एका दिवसात 'कोरोना'नं घेतला 336 जणांचा बळी

धक्कादायक! इटलीमध्ये एका दिवसात 'कोरोना'नं घेतला 336 जणांचा बळी

इटलीमध्ये आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 7 हजार 375 वर पोहोचली आहे.

    रोम, 09 मार्च : चीनमधून पसरणाऱ्या कोरोना व्हायरसनं आता हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. भारतातही आतापर्यंत 39 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. इटलीमध्ये एका दिवसात जवळपास 1 हजार 492 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढू नये यासाठी सरकारनं आता 2.2 कोटी मास्कची ऑर्डरही केली आहे. चीननंतर कोरोना व्हायरसचा प्रभाव सर्वाधिक असणारा देश इटली आहे. आतापर्यंत झपाट्यानं या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असून मृतांच्या आकडा 133 वरुन 336 झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. इटलीमध्ये आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 7 हजार 375 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे इटलीतील सिनेमागृह, संग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासोबतच इटलीत संक्रमण वाढू नये म्हणून वारंवार प्रशानकाडून जनजागृतीही करण्यात येत आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शनिवारपर्यंत अमेरिकेत तब्बल 19 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या 89 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून मृत्यांचा आकडा वाढून 19 पर्यंत पोहोचला आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर एन्ड्रयू कुओमो यांनी सांगितले की, शनिवारी राज्यात 13 नवीन प्रकरणं समोर आली आहे. ज्यामुळे रुग्णांचा आकडा 89 पर्यंत पोहोचला आहे. यामुळे राज्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. भारतात कोरोनाव्हारच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. केरळात पुन्हा कोरनाव्हायरससने शिरकाव केला आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 39 झाली आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळात कोरोनाव्हायरसचे 5 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी तिघं जण इटलीला गेले होते. भारतात परतल्यानंतर ते आपल्या 2 नातेवाईकांच्या संपर्कात आले होते. ज्या मूळ 3 रुग्णांना कोरोनाव्हायरसची लागण झाली ते पठ्ठणमथित्ता (Pathanamthitta)चे रहिवासी आहे. दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Corona virus, Coronavirus in india, Italy

    पुढील बातम्या