मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कोरोना लशीवर काम करणाऱ्या वैज्ञानिकाचा 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

कोरोना लशीवर काम करणाऱ्या वैज्ञानिकाचा 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तर मृत वैज्ञानिकाच्या अंगावर चाकूचे काही निशाण देखील पोलिसांना आढळले आहेत.

    नवी दिल्ली, 21 डिसेंबर : जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. एकीकडे कोरोना लशीवर वेगानं काम सुरू आहे तर दुसरीकडे कोरोनाचं नवीन रूप समोर आल्यानं जगभरासाठी चिंतेची बाब ठरली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोरोना लशीवर काम करणाऱ्या वैज्ञानिकाचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू संशयित असल्याचं सांगितलं जात असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. कोरोना लस तयार करण्यात महत्त्वाचं योगदान असलेल्या शस्त्रज्ञाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याचं सांगितलं जात आहे. 45 वर्षीय वैज्ञानिक अलेक्झांडर साशा कागनस्की 14 व्या मजल्यावरून खाली कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार घटनेदरम्यान पूर्ण कपड्यांमध्ये नव्हते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हत्येचा संशय असल्याच्या दिशेनं तपासाची सूत्र हलवण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तर मृत वैज्ञानिकाच्या अंगावर चाकूचे काही निशाण देखील पोलिसांना आढळले आहेत. मॉस्कोव्हस्की कोमोसोमलेट्स या रशियन वृत्तपत्राच्या अहवालानुसार, कागनस्की कोरोना लस तयार करण्यात सहभागी होते. त्यांचा मृतदेह विचित्र अवस्थेत होता. ते कोणत्या लशीवर काम करत होते याबाबत अद्याप खुलासा करण्यात आला नाही. हे वाचा-लंडनमुळे जगभरात टेन्शन, 5 देशात नो एन्ट्री; या कारणामुळे वाढली भारताची काळजी कागनस्की यांनी रशियातील एका विद्यापीठात जीनॉमिक आणि रीजनरेटिव्ह मेडिसिन फॉर जेनोमिक आणि सेंटर फॉर जीनॉमचे संचालक म्हणूनही काम पाहिले. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लॅटच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडण्यापूर्वी त्यांचा कोणाशीतरी वाद झाला असावा, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Corona vaccine

    पुढील बातम्या