Home /News /videsh /

कोरोनाग्रस्त असल्याच्या संशयातून गर्भवती महिलेला बेदम मारहाण; जीवेमारण्याचा केला प्रयत्न

कोरोनाग्रस्त असल्याच्या संशयातून गर्भवती महिलेला बेदम मारहाण; जीवेमारण्याचा केला प्रयत्न

या 24 वर्षीय तरुणाने महिलेचा गर्भ पाडण्याचा प्रयत्न केला होता

    नवी दिल्ली, 22 मार्च : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) ची दहशत पसरली आहे. यादरम्यान कोरोनाचा (Covid - 19) संसर्ग झाल्याच्या संशयातून एका तरुणाने गर्भवती (pregnant) महिलेला गळा आवळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही महिला 6 महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाग्रस्त असल्याच्या संशयावरुन या तरुणाने गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली. त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या साहाय्याने तिचा गळा आवळला. काही काळ महिला स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत राहिली. मात्र कालांतराने ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. हे वाचा - कंपनी मालकाने जपली सामाजिक बांधिलकी, मार्चमध्येच कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार या तरुणावर महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण फ्लोरिडा येथील आहे. 24 वर्षीय जॉन कॉरी या तरुणाला त्याच्या मजल्यावर राहणारी महिला कोरोनाबाधित असल्याचा संशय आला होता. त्यातून तरुणाने 17 मार्च रोजी महिलेसोबत दुर्व्यवहार केला. तत्सम महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. देशभरात कोरोनामुळे लोकांच्या मनात भीती आहे. त्यातूनही हा क्रुर प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. कोरोना हे जगावर घोंगावणारं संकट आहे. मात्र याला लढा देताना माणूसकी विसरू नये. सर्वांना एकत्र घेऊन कोरोनाशी दोन हात करणे अधिक सोपं जाईल, हे नागरिकांनी लक्षात ठेवायला हवं. संबंधित - VIDEO शरद पवारांनी टाळ्या वाजवून मानले आभार, 'जलसा'वरही टाळ्यांचा कडकडाट
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या