मित्राच्या अंत्यविधीला गेला कोरोनाबाधित रुग्ण, अन् काही दिवसांतच संपूर्ण देशात पसरला कोरोना

मित्राच्या अंत्यविधीला गेला कोरोनाबाधित रुग्ण, अन् काही दिवसांतच संपूर्ण देशात पसरला कोरोना

मित्राच्या अंत्यविधीने धोक्यात घातला लाखो लोकांचा जीव, असा फुटला कोरोनाचा टाइम बॉम्ब

  • Share this:

वॉशिंग्टन, 09 एप्रिल : कोरोनाविषाणूने अमेरिकेत थैमान घातले आहे. एका विषाणूने या महासत्ता देशाचे कंबरडे मोडले. अमेरिकेत सध्या 4 लाख 34 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 14 हजार 800 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत कोरोनाने शिरकाव केला. त्याआधी अमेरिका आपण स्वत: ला कोरोनापासून वाचविले आहे, अशा विचारत होती. मात्र दुसरीकडे शिकागोमध्ये कोरोनाचा टाइम बॉम्ब फिरत होता.

शिकागोमध्ये कोरोनाची लक्षणे असलेला व्यक्ती आपल्या मित्राच्या अंत्यविधीसाठी गेला. त्यावेळी शेकडो लोकं उपस्थित असल्याची शक्यता होती. आज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल विभागाने कोरोनाचा हा रुग्ण अंत्यविधीनंतर आपल्या नातेवाईकांसमवेत वाढदिवसाच्या पार्टीतही गेला होता. या व्यक्तीला हे माहित नव्हते की त्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अमेरिकेतील ही पहिली क्लस्टर आउटब्रेकची घटना होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

वाचा-मॉब लिंचिंगचा गंभीर प्रकार, कोरोनाच्या संशयावरून लाथा-बुक्क्यांनी तरुणाची हत्या

अमेरिकेतील इलिनॉय या राज्यातील शिकागो हे सर्वात मोठे शहर आहे. या राज्यात 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळं लोकं घराबाहेर पडत होता. सीडीसीने सांगितले की, हे एक उदाहरण आहे. जेव्हा तुम्ही लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत नाही, त्याचे काय परिणाम होतात. या एका प्रकरणामुळे शिकागोमध्ये सुपर स्प्रेडिंगची घटना घडली.

वाचा-हॉटस्पॉट भागात राहणारे लोक काय करू शकतात आणि काय नाही? जाणून घ्या सर्व माहिती

अशी घडली सुपर स्प्रेडिंगची घटना

शिकागोमध्ये जेव्हा 'इंडेक्स रूग्ण' म्हणून संबोधलेल्या व्यक्तीने अंत्यसंस्काराच्या आदल्या रात्री आपल्या कुटुंबासमवेत जेवण केले. त्यानंतर दुसर्‍या कुटुंबातील दोन सदस्यांसह तो अंत्यविधीसाठी पोहचला. रात्री जवळजवळ तीन तास तो लोकांच्या संपर्कात होता. या अंत्यविधीत चार लोकांना मिठी मारल्याचेही सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या व्यक्तीने मास्कचा वापर केला नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच्या संपर्कात आलेल्या 7 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यातील 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्य म्हणजे हा व्यक्ती संपर्कात आलेल्या लोकांचा वयोगट हा 25 ते 40 होता. या घटनेनंतर शिकागोमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार झाला. अमेरिकेत न्यूयॉर्कनंतर शिकागोमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत.

वाचा-वरळीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर हालचाली, क्वारन्टाइनसाठी मोठी व्यवस्था

संकलन, संपादन-प्रियांका गावडे

First published: April 9, 2020, 11:30 AM IST

ताज्या बातम्या