'हाय ब्लड शुगर’मुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका सर्वाधिक; नव्या अभ्यासातून आली माहिती समोर

'हाय ब्लड शुगर’मुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका सर्वाधिक; नव्या अभ्यासातून आली माहिती समोर

अद्याप कोरोनावर लस सापडली नाही, मात्र विविध संशोधनातून बाब समोर येत आहे

  • Share this:

बीजिंग, 11 जुलै : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अद्याप कोरोनाची लस शोधण्यात संशोधकांना यश आलेलं नाही. मात्र रक्तातील जास्त साखर, मधुमेह, अस्थमा आदी आजाराची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुसार असे म्हटले आहे की कोरोनाच्या ज्या रुग्णांमध्ये मधुमेहाच्या मागील निदानाशिवाय रक्तातील साखरेची पातळी वाढली आहे, त्यांना मृत्यूचा धोका अधिक असू शकतो.

या नवीन अभ्यासानुसार, संसर्गजन्य रोगामुळे इतर गंभीर गुंतागुंत होण्याचा धोकाही संभवतो.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या अभ्यासानुसार असे नोंदवले गेले होते की कोविड – 19 च्या रुग्णामध्ये उच्च रक्त शर्करा मृत्यूच्या जोखमीशी संबंधित आहे. ते म्हणाले की, 'फास्टिंग ब्लड ग्लूकोज' (एफबीजी) पातळी आणि रुग्णालयात भरती दरम्यान कोविड -19  रूग्णांच्या क्लिनिकल निष्कर्षांमधील थेट संबंध प्रस्थापित झाला नाही.

‘डायबेटोलॉजीया’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात, संशोधकांनी चीनमधील दोन रुग्णालयात दाखल होताना मधुमेहाचे पूर्वीचे निदान न करता एफबीजी आणि कोविड - 19 रुग्णांच्या 28 दिवसांच्या मृत्यूदराच्यामधील संबंधांची तपासणी केली. अभ्यासात असे म्हटले आहे की, 'कोविड – 19 च्या सर्व रूग्णांना मधुमेहाची लागण झाली नसली तरी रक्तपेढीनी रक्ताची तपासणी करण्याची शिफारस केली पाहिजे कारण कोविड – 19 संक्रमित झालेल्या बहुतेक रूग्णांमध्ये ग्लूकोज मेटाबॉलिक संबंधित विकार असल्याची शक्यता आहे

हे वाचा-धक्कादायक! देशात अवघ्या 6 दिवसांत 1 लाख कोरोना रुग्णांची वाढ

अभ्यासात एकूण 605 कोविड – 19 रुग्णांचा समावेश होता, त्यापैकी 114 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अभ्यासानुसार यामध्ये 322 पुरुष सहभागी होते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोविड - 19 रुग्ण उच्च रक्तातील साखरेने ग्रस्त असू शकतात.

Published by: Meenal Gangurde
First published: July 11, 2020, 9:55 PM IST

ताज्या बातम्या