कोरोनाचा उद्रेक! आतापर्यंत 1600 जणांचा मृत्यू, 68 हजार बाधित

कोरोनाचा उद्रेक! आतापर्यंत 1600 जणांचा मृत्यू, 68 हजार बाधित

आतापर्यंत 1,700हून अधिक चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

  • Share this:

बीजिंग, 16 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसमुळे (Corona) चीनमध्ये हा:हाकार माजला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत तब्बल 1600 जणांचा मृत्यू झाला असून 68 हजार लोकांना याची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डिसेंबरपासून कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने आणखी 2009 रुग्णांना बाधा झाल्याचे सांगितले आहे. हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये 1,843 नवी प्रकरणं समोर आली आहेत. चीनच्या सरकारी समाचार एजन्सी शिन्हुआच्या बातमीनुसार शनिवारी ज्या 142 लोकांचा मृत्यू झाला त्यापैकी 139 हुबेईमध्ये सिचुआनमध्ये 2 आणि हुनानमध्ये 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9,419 संक्रमित रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यातही कोरोनाचा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 1,700हून अधिक चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शुक्रवारी, चीन सरकारने हुबेई प्रांत सोडून देशाच्या इतर भागात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 'सक्तीने घट' ची रुपरेषा आखली. दरम्यान, चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या आजारावर उपचार करण्यासाठी आणि बचावासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाऊड संगणकीय अशा डिजिटल तंत्रज्ञानाची मदत करण्याचे आवाहन केले. साहित्य आणि इतर ऑपरेशन्समध्ये मदत करण्यासाठी वुहानच्या रुग्णालयात रोबोट तैनात केले आहेत.

ब्लड प्लाझ्माने होऊ शकतो कोरोना व्हायरसवर उपचार

चीनमधील सरकारी मेडिकल कंपनी नॅशनल बायोटेक ग्रुपने दावा केला आहे की, ब्लड प्लाझ्माने कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात. कंपनीने असाही दावा केला आहे की, 8 फेब्रुवारी नंतर कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या 10 रुग्णांवर यापद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. आता ते रुग्ण या उपचारांच्या मदतीने बरेही झाले आहेत. या पद्धतीच्या वापरानंतर मिळालेल्या रिझल्ट्समुळे या मेडिकल बायोटेक कंपनीचा या उपचारपद्धतीवरील विश्वास आणखीन वाढला आहे. आणि त्यामुळेच ही उपचारपद्धती कोरोनाव्हायरसवरची विश्वासात्मक उपचारपद्धत मानली जात आहे.

First published: February 16, 2020, 2:31 PM IST

ताज्या बातम्या