Home /News /videsh /

अमेरिकेतील कोरोना रुग्णाची हाताची बोटंच कापली; तरीही ना हरला ना रडला, जिद्दीनं लढला!

अमेरिकेतील कोरोना रुग्णाची हाताची बोटंच कापली; तरीही ना हरला ना रडला, जिद्दीनं लढला!

इटलीला एका ट्रिपदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अमेरिकेत आल्यानंतर त्याची प्रकृती ढासळली

    लॉस एन्जलिस, 26 जुलै : कोरोनाच्या या संकट काळात अनेक धक्कादायक घटना वारंवार समोर येत आहेत. कोरोनाचा संकट काळ कधी संपतो याक़डे जगातील प्रत्येक व्यक्ती आशा लावून बसला आहे. असाच एक किस्सा अमेरिकेतील लॉस एन्जलिसधील घडला आहे. येथील ग्रेग गारफिल्ड यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते अत्यंत गंभीर झाले होते की दोन महिन्यांपासून त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. या रुग्णाच्या हातातील अधिकतर बोटं कापण्यात आली आहेत. 54 वर्षीय आहेत ग्रेग गारफील्ड या व्हायरसच्या आजारामुळे 54 वर्षीय ग्रेग 2 महिन्यांपर्यंत रुग्णालयात भरती होते. अमेरिकेच्या लॉस एन्जलिसमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीच्या हाताची बोटं खराब झाली आणि डॉक्टरांना शेवटी ग्रेगच्या हातातील बोटं कापावी लागली. हे वाचा-कोरोनानंतर अमेरिकेत आणखी एक संकंट, तब्बल 640 लोकांना झाली विचित्र आजाराची लागण ग्रेग गारफील्ड कोरोना विषाणूच्या सुरुवातीच्या दिवसात बाधित झाले होते. इटलीच्या एका ट्रिपदरम्यान ग्रेग आणि त्यांचे काही मित्र पॉझिटिव्ह झाले होते. अमेरिकेत आल्यानंतर ते आजारी पडले. सर्वसाधारणपणे दोन ते 3 आठवड्यांच्या उपचारानंतर कोरोना रुग्णांना घरी पाठवले जाते. मात्र ग्रेग यांना डिस्चार्ड देण्यात आला नव्हता. ते हळूहळू गंभीर होत होते. सुदैवाने ते या आजारातून वाचले. कारण डॉक्टरांकडून फार सकारात्मक प्रतिसाद येत नव्हता. सुरुवातीच्या काही दिवसातच त्यांचा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र ते यातून बाहेर पडले मात्र त्यांना हाताची बोटं गमवावी लागली. सध्या जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यातही अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधित आहे. रुग्णांसह येथे मृत्यूचा आकडाही मोठा आहे. मोठ मोठ्या देशांना कोरोनावर नियंत्रण आणणे अद्याप शक्य झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन उठवलेल्या अनेक देशांमध्ये पुन्हा नियम कडक केले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या