Home /News /videsh /

कोरोनाची दहशत! पत्नीला व्हायरल झाल्याचा संशय येताच पतीने बाथरुममध्ये ठेवलं कोंडून

कोरोनाची दहशत! पत्नीला व्हायरल झाल्याचा संशय येताच पतीने बाथरुममध्ये ठेवलं कोंडून

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

पत्नी बाथरूममध्ये बंद असल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. यानंतर पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये येऊन महिलेची सुटका केली.

    लिथुआनिया, 03 मार्च : कोरोना व्हायरसची लागण होण्याच्या भीतीनं एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला बाथरूममध्ये बंदिस्त केलं आहे. बायको एका चीनी महिलेला भेटल्यामुळे त्याला असं वाटलं की पत्नीलाही कोरोना झाला असेल. म्हणून त्याने महिलेला बाथरुममध्ये बांधून ठेवलं आहे. पत्नी बाथरूममध्ये बंद असल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. यानंतर पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये येऊन महिलेची सुटका केली. डेली मेलच्या वृत्तानुसार, युरोपमधील लिथुआनियाच्या लेव्हियसचे हे प्रकरण आहे.  कोरोनाच्या विषाणूच्या भीतीने पत्नीला बाथरूममध्ये बंद ठेवल्याची घटना आहे. नंतर केलेल्या तपासणीत महिलेला कोरोना विषाणूची लागण झालेलं आढळलं नाही. दरम्यान, पत्नीने पतीविरूद्ध फौजदारी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पती अटकेपासून वाचला. खरंतर, पत्नी एखाद्या चिनी महिलेला भेटायला गेल्याचं कळताच नवऱ्याला भीती वाटली. त्यामुळे त्याने असा धक्कादायक प्रकार केला. तर लिथुआनियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची केवळ एक नोंद झाली असल्याचं अहवालामध्ये समोर आलं आहे. जगातील सुमारे 70 देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यापैकी चीन, इराण आणि दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. संबंधित - मोबाईलमध्येही घुसला कोरोना; 'या' मेसेजवर क्लिक कराल तर व्हाल व्हायरसचे शिकार संपूर्ण जगात कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आपली दहशत पसरवली आहे. भारतातही (India) आता कोरोनाव्हायरसचे आणखी 3 रुग्ण आढळून आलेत. हाच कोरोना आता हॅकर्सचं शस्त्र झाला आहे. भले तुम्ही कोरोनाव्हायरसचे शिकार नाहीत, मात्र तुम्ही सायबर फ्रॉडचे (cyber fraud) शिकार जरूर होऊ शकता. मिळालेल्या माहितीनुसार हॅकर्सनी (hacker) सर्वात आधी जपान आणि त्यानंतर अमेरिका, ब्रिटनला आपलं शिकार बनवलं. आता मुंबईसहित पूर्ण भारतावर त्यांची नजर आहे. हे वाचा - आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांची नियुक्ती नाहीच कोरोनाव्हायरसची भीती सर्वांच्या मनात आहे. त्यामुळे कोरोनाव्हायरस म्हणजे काय, कोरोनाव्हायरसची लक्षणं, त्यापासून वाचण्याचा उपाय असं इंटरनेटवर तुम्ही सर्च करत आहात. तुमच्या याच भीतीचा फायदा हॅकर्सनी घेतला आहे. त्यामुळे हॅकर्स कोरोनाव्हायरसंबंधित माहिती, अलर्ट, दक्षतेबाबत मेल किंवा व्हॉट्सअप मेसेज पाठवत आहेत. तुम्हालाही असे मेसेज आले असतील आणि तुम्ही त्यावर क्लिक केला तर एका क्लिकवर तुम्ही हॅकर्सचे शिकार होऊ शकता. हे वाचा - 'माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबध', विद्या चव्हाणांचा धक्कादायक आरोप
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या