कोरोनाचा कहर : या देशातल्या शहरात रस्त्यावरच पडले मृतदेह, अंत्यसंस्काराला कुणीच तयार नाही

कोरोनाचा कहर : या देशातल्या शहरात रस्त्यावरच पडले मृतदेह, अंत्यसंस्काराला कुणीच तयार नाही

इक्वेडोरच्या ग्वाकिल शहरातले सर्व हॉस्पिटल्स भरलेले आहेत. त्यामुळे नवीन येत असेलले कोरोना रूग्ण हे देवाच्या भरवश्यावर सोडून दिले जात आहेत.

  • Share this:

ग्वाकिल 05 एप्रिल : कोरोनामुळे जगातले जवळपास सर्वच देश त्रस्त आहेत. प्रत्येक देश आपापल्या परीने कोरोनाशी झगडतो आहे. जगातला सर्वात शक्तिमान देश समजला जाणारा अमेरिका कोरोनामुळे हतबल झाला आहे. साधनांची कमतरता आहे. त्यामुळे इतर देशांचं काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. इक्वेडोर या देशातही कोरोनाने कहर केलाय. आधीच साधनांची कमतरता, आर्थिक परिस्थिती बेताचीच, आरोग्य व्यवस्थेचे बारा वाजलेले. अशा परिस्थितीत कोरोनामुळे हा देश त्रस्त झालाय. अनेक शहरांमध्ये मृतदेह रस्त्यावरच टाकून दिले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायलाही कुणी तयार नाही अशी परिस्थिती आहे.

इक्वेडोरच्या ग्वाकिल शहरातले सर्व  हॉस्पिटल्स भरलेले आहेत. नवीन रूग्णांसाठी तिथे आता जागाच नाही. त्यामुळे नवीन येत असेलले कोरोना रूग्ण हे देवाच्या भरवश्यावर सोडून दिले जात आहेत. अनेकांचा मृत्यू घरातच होत आहे. अशा लोकांना रस्त्यावरच ठेवलं जात आहे.

त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरची मंडळीही पुढे येत नाही. कारण त्यांना इन्फेक्शनचा धोका वाटतो. तर स्थानिक पालिका प्रशासनाकडे त्यासाठी पुरेशी माणसं आणि व्यवस्था नाही. शहरातल्या अनेक रस्त्यांवर अशी प्रेतं दिसत असून त्यामुळे रोगराई आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे वाचा - ‘वुहान लॅब’मधूच पसरला ‘कोरोना व्हायरस’, ब्रिटन गुप्तचर संस्थेचा खळबळजनक रिपोर्ट

स्पेनमध्ये 1 लाख 20 हजार लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे, तर आतापर्यंत येथे सुमारे 12 हजार लोक मरण पावले आहेत. दरम्यान, येथील वृद्धाश्रमांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या आश्रमांमध्ये त्यांची देखभाल करण्यासाठी लोकं नाही आहेत. त्यामुळे वृद्धांना घरात कैद करण्यात आले आहे.

 हे वाचा - एकीकडे 12 हजार लोकांचा मृत्यू, तरी स्पेनमधील 'या' शहराने रोखला कोरोना

खरं तर, स्पेनमधील बहुतेक सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार केले जातात, अशा परिस्थितीत येथे सामान्य आजारांचा उपचार केला जात नाही आहेत. अशा लोकांकरिता केअर होमची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र केअर होममध्ये काम करण्यासाठी लोकं मिळत नसल्यामुळे ते ओस पडले आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास दोन तृतीयांश लोकांना सुट्टी देण्यात आली आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2020 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading