मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लॉकडाऊन असूनही चीनमध्ये कोरोनाचा कहर, वाढती रुग्णसंख्या इतर देशांसाठीही चिंतेची बाब?

लॉकडाऊन असूनही चीनमध्ये कोरोनाचा कहर, वाढती रुग्णसंख्या इतर देशांसाठीही चिंतेची बाब?

चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. (China Corona) मागील 24 तासांत इथे 2,723 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यातील 2,417 रुग्ण हे फक्त शांघाय येथील आहेत, ही माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NCH) दिली.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

शांघाय (चीन), 19 एप्रिल : चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. (China Corona) मागील 24 तासांत इथे 2,723 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यातील 2,417 रुग्ण हे फक्त शांघाय येथील आहेत, ही माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NCH) दिली. तर शांघाय व्यतिरिक्त 15 अन्य प्रांतात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यात जिलिनच्या उत्तरपूर्वी प्रांतात 166 रुग्ण आढळून आले आहे. शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, शांघायमध्ये रविवारी कोरोनाचे लक्षण नसलेली 19,831 रुग्ण आढळून आले आहेत.

अहवालानुसार, रविवारी 1637 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे, रविवार पर्यंत एकूण 1,51, 407 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. शाघांयमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये शून्य कोरोना धोरण लागू करण्यात आले आहे. शांघायसोबत अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. एकट्या शांघाय शहरात अडीच कोटी लोक आहेत. कोरोनाच्या नव्या लाटेनंतर शांघायमध्ये पहिल्यांदाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. सांगण्यात येत आहे की, 2019मध्ये वुहानमध्ये कोरोनाचे महासंकट आल्यानंतर शांघाय हे सर्वात जास्त रुग्णसंख्येचे शहर बनले आहे.

हेही वाचा - लाऊडस्पीकर संदर्भात गृहमंत्र्यांची बैठक, देशात कोरोना पुन्हा सक्रीय.. देशविदेशातील TOP बातम्या

28 मार्चला चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटला नियंत्रित करण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. शांघाईसोबत अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढल्यानंतर प्रतिबंध लावण्यात आले. चीनचे उत्तरी पश्चिमी शहर जियानमध्ये (Xian) या महिन्यात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने निर्देश दिले आहेत की, लोकांनी विनाकारण बाहेर निघून नये.

First published:

Tags: Corona, Corona spread, Coronavirus cases