कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री घटली; कारण आहे...

कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री घटली; कारण आहे...

दक्षिण अमेरिकेतील रोमान्सची अशी ओळख असलेल्या अर्जेंटिनामध्ये सध्या गर्भनिरोधकाच्या वापरात मोठी घसरण झाली आहे.

  • Share this:

बुएनोस आइरेस, 20 सप्टेंबर: दक्षिण अमेरिकेतील रोमान्सची अशी ओळख असलेल्या अर्जेंटिनामध्ये सध्या गर्भनिरोधकाच्या वापरात मोठी घसरण झाली आहे. विशेषत: कंडोमच्या वापरत संपूर्ण देशात वेगाने घट झाली आहे. गर्भनिरोधकाच्या वापरामध्ये झालेली कपात इतकी मोठी आहे की ही गोष्ट जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकातील अर्थव्यवस्थेमध्ये सध्या मंदी आहे. संपूर्ण देशातील मंदीचे प्रमाण हे 2.6 टक्के इतके असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय महागाी 50 टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. अशातच गर्भनिरोधकाच्या वापरात झालेली कपात हा विषय चर्चेत आला आहे.

स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार देशात गर्भनिरोधक विशेषत: कंडोमच्या वापरता झालेली घट याचे मुख्य कारण अन्य कोणतेही नसून मंदी आणि वाढलेली महागाई आहे. अर्जेंटिनाचे चलन पेसोची डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे देशातील गर्भनिरोधकाच्या किमती वाढल्या आहेत. देशातील औषध विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंडोमच नाही तर अन्य गर्भनिरोधकाच्या विक्रीत विक्रमी अशी घट झाली आहे.

2018च्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत पेसोमध्ये दोन तृतियांश घसरण झाली होती. या घसरणीचा थेट परिणाम आयतीवर झाला आणि त्यानंतर वस्तूंची मागणी कमी झाली. गर्भनिरोधक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या मते 2018च्या सुरुवातीला तुलनेत कंडोमच्या विक्रीत सध्या 8 टक्क्यांनी घट झाली आहे. काही दिवसात ही घट एक एक चर्तुथांशपर्यंत पोहोचू शकते. एका कंडोम कंपनीचे सीईओ असलेल्या फेलिपे कोपेलोविज यांच्या मते, कंडोम निर्मीतीसाठी ज्या गोष्टींची गरज असते त्यातील अनेक गोष्टी आयात कराव्या लागतात. चलन घसरल्यामुळे त्याचा परिणाम आयात वस्तूंवर होत आहे. वर्षाच्या सुरुवातीला कंडोमच्या विक्रीवर 36 टक्क्यांपर्यंत नफा होत होता. आता त्यात घसरण झाली आहे. अन्य गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये देखील यंदा 6 टक्क्यांनी घट झाली आल्याचे ते म्हणाले. देशातील जवळपास 1 लाख 44 हजार महिलांनी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर थांबवला आहे. या सर्व महिला प्रत्येक महिन्याला गर्भनिरोधक गोळ्या घेत होत्या.

खड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड! झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 02:22 PM IST

ताज्या बातम्या