महिलेनं नोकरीसाठी केला अर्ज, कंपनीने तिचा बिकीनी PHOTO शेअर करत म्हटलं...

महिलेनं नोकरीसाठी केला अर्ज, कंपनीने तिचा बिकीनी PHOTO शेअर करत म्हटलं...

नोकरीसाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवाराच्या सोशल मीडियावरचा फोटो कॉपी करत कंपनीने तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. त्यानंतर महिलेनं ट्वीट करत याविरोधात मोहिम उघडल्यानंतर कंपनीला अखेर माफी मागावी लागली.

  • Share this:

टेक्सास, 15 ऑक्टोबर : एका मार्केटिंग कंपनीने त्यांच्याकडे कामासाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवाराचा बिकीनीतील फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कंपनीने महिला उमेदवाराचा बिकीनीतला फोटो शेअर करत म्हटलं की, असे फोटो पोस्ट करून नोकरी मिळत नाही. यामुळे अमेरिकन कंपनी Kickass Masterminds वर टीका होत आहे. शेवटी त्यांना माफीही मागावी लागली.

Kickass Masterminds कपंनीने फोटो पोस्ट केल्यानंतर एमिली क्लोने स्लट शेम म्हणत ट्विटरवर पोस्ट केली. त्यानंतर कंपनीच्या पोस्टला ट्रोल करण्यात आलं. एमिलीचा फोटो पोस्ट करताना कंपनीने म्हटलं की, आम्हाला माहिती आहे की तुमच्यापैकी अनेकजण नोकरी शोधत आहेत. संभाव्य एम्पलॉयरसोबत अशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका. तुम्ही खासगीत काहीही करा पण प्रोफेशनल नोकरी मिळवायची असेल तर याचा फायदा होणार नाही.

एमिलीला कंपनीची अशा प्रकारची पोस्ट पाहून धक्काच बसला. त्यानंतर एमिलीने लिहिलं की, बिकिनीतील एका फोटोमुळं माझ्यावर अनप्रोफेशनल असल्याचं कसं म्हणू शकतात. एमिलिच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरनं म्हटलं की, तु बाथिंग सूटमध्ये सुंदर दिसत आहेत. तुमचं प्रोफेशनलिझम यावर अवलंबून नाही की तुम्ही कामानंतर कसे कपडे घालता. काम संपल्यानंतर तुम्ही कसं रहावं हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे असंही काही युजर्सनी म्हटलं आहे.

View this post on Instagram

not bothered

A post shared by emily clow (@clowd_nine) on

दरम्यान, कंपनीची संस्थापक सारा क्रिस्टेनसनने बिकीनीतील फोटोमुळे नोकरी नाकारल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. मात्र, आम्ही ती पोस्ट करायला नको होती असं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Instagram
First Published: Oct 15, 2019 01:24 PM IST

ताज्या बातम्या