मक्काच्या ग्रँड मशिदीच्या छतावरून फ्रेंच नागरिकाने केली आत्महत्या

इस्लामचं पवित्र शहर मक्काच्या ग्रँड मशिदीच्या छतावरून एका फ्रेंच नागरिकाने आत्महत्या केली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 10, 2018 01:03 PM IST

मक्काच्या ग्रँड मशिदीच्या छतावरून फ्रेंच नागरिकाने केली आत्महत्या

10 जून : इस्लामचं पवित्र शहर मक्काच्या ग्रँड मशिदीच्या छतावरून एका फ्रेंच नागरिकाने आत्महत्या केली आहे. एसपीए न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, सौदी पोलिसांनी सांगितले की, 'एक विदेशी नागरिकाने  मक्काच्या ग्रँड मशिदीच्या छतावरून उडी मारली आहे. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयानेदेखील आत्महत्या केलेला नागरिक फ्रेंच  असल्याची पुष्टी दिली आहे. पण दरम्यान, या युवकाबद्दल अद्याप फार काही माहिती हाती लागली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, या युवकाने उडी मारताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्याच्या मृत्यू झाला होता. दरम्यान, या युवकाने मशिदीच्या छतावरून आत्महत्या का केली असावी, आणि त्याबद्दलचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मक्काच्या या मशिदीवरून आत्महत्या करण्याचं हे काही पहिलं प्रकरण नाही आहे. या आधीही असे प्रकार घडले आहेत. पण दुसरीकडे, इस्लामध्ये मात्र आत्महत्येला गुन्हा मानला जातो. असं असताना मशिदीवरूनच आत्महत्या करणं म्हणजे गंभीर प्रकार आहे.

 

हेही वाचा...

VIDEO : पुरंदरमध्ये वादळ आलं, तलावातलं पाणी ढगात नेलं

नको ते धाडस!, पूल पार करताना 'तो' गेला वाहून

सलग तीन दिवस ड्युटी करुन घरी परतणाऱ्या एसटी चालकाचा मृत्यू

पत्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत जमीनदोस्त

नवी मुंबईत घरात शिरलं पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2018 11:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close