मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बापरे! महासागरांचा जलस्तर वाढण्याचा धोका, पण या समुद्राबाबत आली धक्कादायक माहिती

बापरे! महासागरांचा जलस्तर वाढण्याचा धोका, पण या समुद्राबाबत आली धक्कादायक माहिती

हवामान बदल (Climate Change) आणि जागतिक तापमान वाढीमुळे (Global Warming) जगभरातील महासागरांचा जलस्तर (Water Level) वाढत आहे. मात्र, याच कारणामुळे कॅस्पियन समुद्राचे (Caspian Sea) क्षेत्र संकुचित होत आहे.

हवामान बदल (Climate Change) आणि जागतिक तापमान वाढीमुळे (Global Warming) जगभरातील महासागरांचा जलस्तर (Water Level) वाढत आहे. मात्र, याच कारणामुळे कॅस्पियन समुद्राचे (Caspian Sea) क्षेत्र संकुचित होत आहे.

हवामान बदल (Climate Change) आणि जागतिक तापमान वाढीमुळे (Global Warming) जगभरातील महासागरांचा जलस्तर (Water Level) वाढत आहे. मात्र, याच कारणामुळे कॅस्पियन समुद्राचे (Caspian Sea) क्षेत्र संकुचित होत आहे.

मुंबई, 28 डिसेंबर : हवामान बदल (Climate Change) आणि जागतिक तापमान वाढीमुळे (Global Warming) जगभरातील महासागरांचा जलस्तर (Water Level) वाढत आहे. मात्र, याच कारणामुळे कॅस्पियन समुद्राचे (Caspian Sea) क्षेत्र संकुचित होत आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे जगभरातील महासागरांची जलपातळी वाढताना दिसत आहे. यंदा याबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन झाले असून, त्यानुसार ही बाब रोखणे आता अशक्य असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, या उलट स्थिती जगातील सर्वात मोठ्या कॅस्पियन समुद्राबाबत आहे. हवामान बदलामुळे (Climate change) या समुद्राची जलपातळी घटत असून, समुद्राचे क्षेत्र संकुचित होत असल्याचे दिसून आले आहे.

उष्णता आणि दुष्काळाचा फटका

हिमनग वितळल्याने ताजे पाणी समुद्रांमध्ये मिसळले जात असल्याने जगभरातील महासागरांची पाणीपातळी वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी उष्णता आणि दुष्काळामुळे अनेक भागातील तलाव कोरडे पडत असून, समुद्रांमधील अंर्तभाग देखील कोरडे पडत आहेत तसेच त्यांचे क्षेत्र संकुचित होत आहे. कॅस्पियन समुद्र हा जगातील सर्वात मोठा तलावस्वरुपातील समुद्र आहे. ताज्या संशोधनानुसार, या समुद्रातील अंर्तभाग कोरडा पडत असून, क्षेत्र संकुचित होत आहे.

स्थिती खूपच चिंताजनक

कम्युनिकेशन ऍण्ड इनव्हायरमेंटने (Communication And Enviorment) प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, कॅस्पियन समुद्राची स्थिती खूपच चिंताजनक आहे. येथील स्थिती पूर्ववत होणे मुश्किल आहे. उत्सर्जनाचे प्रमाण असच राहिलं तर या खाऱ्या पाण्याच्या सरोवरातील पाणीपातळी या शतकाच्या अखेरीपर्यंत 9 ते 18 मीटरपर्यंत खालावेल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोणत्या भागांवर होणार परिणाम

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कॅस्पियन समुद्राचा (Caspian Sea) जलस्तर मोठ्या प्रमाणावर खालावल्यास उत्तर भागातील कॅस्पियन शेल्फ आणि दक्षिण पूर्व तुर्कमेनन शेल्फमधील काही भागांत बाष्पीभवन वाढेल, तसेच पूर्व भाग पूर्णपणे कोरडा पडेल. माडेल्सनुसार, स्थिती आणखीनच खालावली म्हणजे पाणीपातळी 18 मीटरपेक्षा अधिक कमी झाली तर या तलावाच्या पृष्ठभागाचे 34 टक्के क्षेत्र संकुचित किंवा कमी होईल.

जाणकार देखील या संकटापासून अनभिज्ञ

मात्र, या सर्व बाबींविषयी बहुतांश शास्त्रज्ञ अनभिज्ञ आहेत, तसेच नागरिकांना या संकटविषयी काहीही माहिती नाही. ज्यांना या संकटाविषयी माहिती आहे, त्यांना त्याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. क्लायमेट चेंजच्या (Climate Change) इंटरनॅशनल पॅनेलने देखील हवामान बदलामुळे होणाऱ्या या तलावातील बाष्पीभवनाच्या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नाही, तसेच संयुक्त राष्ट्रांचेदेखील याकडे लक्ष नाही.

पर्यावरणाला (Eco System) धोका

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जगभरातील अनेक तलावांना अशा प्रकारे धोका आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. त्यामुळे सर्वच घटकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष झाले तर पर्यावरणाला मोठा धोका संभवतो.

मूलगामी बदलांची अपेक्षा

कॅस्पियन समुद्र हा 37 लाख चौरस किलोमीटर विस्तारला असून त्यात 1.2 टक्के पाणी खारे आहे, त्यामुळे या तलावास समुद्राचा दर्जा दिला गेला आहे. यात गेल्या कित्येक वर्षांपासून बदल होत असून, तो कायम राहिल्यास संपूर्ण पर्यावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. जागतिक तापमानवाढीमुळे येथील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण झाले असून हा पहिला दुष्परिणाम यापूर्वीच दिसून आला आहे.

जो पर्यंत मर्यादेपेक्षा अधिक पाणी साठत नाही, तोपर्यंत अशा तलावांमधील पाणी बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे असे तलाव वाढत्या पाणीपातळीबाबत संवेदनशील असतात. यातील पाणीपातळी ही पाऊस, नद्या, वाहून येणारे पाणी आणि बाष्पीभवन प्रक्रियेवर अवलंबून असते. वोल्गा नदीवर अवलंबून असणाऱ्या कॅस्पियन समुद्राबाबतीत देखील असेच आहे.

First published: